डोंबिवली ( शंकर जाधव ) थाटामाटात वाढदिवस साजरा करावा, मोठी माणसं यावी अशी सर्वांचीच अपेक्षा आहे.पण काही माणसं आपला वाढदिवस साजरा करताना तो इतरांसाठी आधार असावा असा मानतात. डोंबिवलीतील समाजसेवक सुजित नलावडे डोंबिवली पश्चिमेकडील र्ओमकार साई बालसंगोपन केंद्र व वृद्धाश्रमात मुलांबरोबर वाढदिवस साजरा केला.
मोठा माणूस आपल्यात आल्याचे पाहून मुलांनी स्वतः औक्षण केले.संस्थेत केक कापून मुलांनी नलावडे यांना शुभेच्छा दिल्या.नलावडे यांनी मुलांना खाऊ तर दिलाच त्याचबरोबर संस्थेला आवश्यक साहित्यपण दिले.संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नलावडे यांचे आभार मानले.मुलांनीही आपल्यातल्याच एकाचा वाढदिवस असल्यासारखे तयारी केली होती.संस्थेच्या पदाधिकारी म्हणतात, नलावडे यासारखी माणस लक्ष देतात म्हणून या मुलांना मायेचा आधार मिळतोय.तर नलावडे यांनी मुलांसाठी नेहमीच मदत करत राहणार असल्याचे सांगितले.

