एंजल वनच्या चीफ डेटा ऑफिसरपदी दीपक चंदानी

 

मुंबई : भारतातील सर्वात विश्वसनीय व पसंतीचा फिनटेक ब्रॅण्ड बनण्याच्या प्रयत्नामध्ये एंजल वन लि. ने चीफ डेटा ऑफिसर म्हणून दीपक चंदानी यांना ऑनबोर्ड करत आपली नेतृत्व टीम प्रबळ केली. ही नियुक्ती फिनटेक कंपनीच्या डेटा व तंत्रज्ञानाच्या वापराच्या माध्य‍मातून अब्जो व्यक्तींच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याप्रती धोरणात्म्क योजनेमधील मोठे यश आहे.

सीडीओ म्हणून आपल्या भूमिकेत दीपक एंजल वन येथील डेटा व विश्लेषण धोरणावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी पार पाडतील. दीपक यांच्यात ऑनबोर्डसह कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग आणि अॅनलिटिक्सच्या माध्यमातून मोठ्या डेटा लेकचा फायदा घेण्यास उत्तमरित्या स्थित आहे.

दीपक यांना भारतातील व यूएसएमधील प्रतिष्ठित कंपन्यांसोबत काम करण्याचा २५ वर्षांहून अधिक काळाचा बहुमूल्य अनुभव आहे, जसे इन्फोसिस, अॅप्पल इन्क., अॅपडायरेक्ट, ग्लोबल लॉजिक, टेराडेटा, यूबीएस व ब्रिटीश पेट्रोलियम, जेथे त्यांनी साइट्सचे व्यवस्थापन पाहिले आणि उच्च२ कार्यक्षम उत्पादन व अभियांत्रिकी टीम्सचे नेतृत्व केले. ग्राहक-केंद्रित सोल्यू्शन्स निर्माण करण्यासाठी विविध माध्यम व टचपॉइण्ट्समधून डेटा एकीकृत करण्याचा त्यांचा प्रमाणित ट्रॅक रेकॉर्ड आहे.

एंजल वन लि. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश ठक्कर म्हणाले, ''नजीकच्या भविष्यात आमचे सर्वात विश्वसनीय फिनटेक कंपनी बनण्याचे ध्येय आहे. दीपक यांचा प्रभावी रेकॉर्ड पाहता आमचा विश्वास आहे की, त्यांचे व्यापक ज्ञान आणि डेटा व तंत्रज्ञानाबाबत असलेल्या सखोल माहितीचा एंजल वनच्या भावी विकासासाठी फायदा होईल. तसेच आमचा विश्वास आहे की ते आम्हाला योग्य निर्णय घेण्यास, नवीन संधी ओळखण्यास आणि ग्राहकांना अद्वितीय मूल्य देण्यास मार्गदर्शन करतील.''

एंजल वन लि.चे चीफ डेटा ऑफिसर दीपक चंदानी म्हणाले, ''एंजल वनने वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात विकास केला आहे आणि मला कंपनी अब्जो व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय संपादित करण्याच्या दिशेने काम करत असल्याच्या काळात कंपनीचा भाग बनणे सन्माननीय वाटत आहे. मी कंपनीच्या भावी विकासामध्ये उत्प्रेरक असण्यासाठी उत्सुक आहे. तसेच मी विभागांमधील टीम्ससोबत सहयोग करत एकूण ग्राहक अनुभवामध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी उपलब्ध मोठ्या डेटा लेक्सवर आधारित सोल्यूशन्स सादर करण्यास उत्सुक आहे.''

Post a Comment

Previous Post Next Post