डोंबिवली स्टेशनपरिसरातील त्या प्रस्तावच पुढे काय झालं

 


हिरवा कंदील की फक्त आश्वासन

डोंबिवली ( शंकर जाधव ) मोठं मोठं होर्डिंग... पाहणी दौरा.... पालिका आयुक्तांची भेट.. असे सर्व घडूनही त्या  प्रस्तावाला प्रशासन  गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे. डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील अनधिकृत फेरीवाले हटवून त्याजागी मीटर पद्धतीने रिक्षा थांबा हा प्रस्ताव देऊन पाच-सहा महिने उलटले. पण पुढे या प्रस्तावाच काय झालं असा प्रश्न डोंबिवलीकरांना पडला आहे. या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाली की ते नुसतं डोंबिवलीकरांना आश्वासन होत असा प्रश्न उपस्थित होत आहे.

   डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील अनधिकृत फेरीवाले हटविण्यासाठी मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांसह मनसैनिकांनी स्टेशन परिसराची पाहणी केली होती. त्यावेळी फेरीवाला संघटनेने आमदार पाटील यांची भेट घेऊन नोंदणीकृत फेरीवाल्यांना पालिका प्रशासनाने जागा द्यावी अशी मागणी केली होती. तस रिक्षा युनियनच्या काही पदाधिकाऱ्यांनी आमदार पाटील यांची भेट घेऊन स्टेशन परिसरातील फेरीवाले हटविल्यानंतर त्या जागी मीटर पद्धतीने रिक्षा थांबा बनविण्याची मागणी केली. यावर मनसेने हा चांगला प्रस्ताव असून उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक विभागाला याची माहिती देऊ असे सांगितले. मात्र त्यानंतर या प्रस्तावाचे काय झालं हे अजून नागरिकांना समजले नाही. वास्तविक स्टेशन परिसरातील फेरीवाले हटवून त्याजागी मीटर पद्धतीने  रिक्षा थांबा असावा अशी मागणी डोंबिवलीकरांची आहे. मात्र यावर उपप्रादेशिक परिवहन विभागाला गांभीर नसल्याचे दिसते. 


चौकट

उपप्रादेशिक परिवहन विभागाचे प्रवाशांचे काहीही पडले नाही...

मनसेच्या आंदोलनाला डोंबिवलीकरांनी साथ दिली होती.स्टेशन बाहेरील मीटर पद्धतीने रिक्षा थांबा ही मागणी पूर्ण व्हावी याकरता मनसे प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे.पण उपप्रादेशिक परिवहन विभागला जनतेचे काहीही पडले नाही. प्रवाशांना चांगली सोय व्हावी याकरता मनसेने नागरिकांच्या पाठींबा दिला.पण हा प्रस्ताव पूर्व व्हावा याकरता मनसे प्रयत्नशील आहे.

      -मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष 


    विविध राजकीय पक्षांनी जनतेसाठी आंदोलन केले तरी प्रशासनाला याचे काहीही पडले नाही.मीटर पद्धतीने प्रवास  ही डोंबिवलीकरांची मागणी आहे.पण उपप्रादेशिक परिवहन विभाग व पालिका प्रशासन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष देत नाही हे यावरून दिसून येते.

        - प्रोटेस्ट अंगेस्ट ऑटोवाला संघटना सचिन गवळी



Post a Comment

Previous Post Next Post