निवारण करण्यासाठी 18002330045 टोल फ्री क्रमांक
डोंबिवली ( शंकर जाधव )
जुलैमध्ये मुसळधार पर्जन्य वृष्टी होत असल्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहे. खड्डे भरण्याचे काम सातत्याने चालू ठेवण्याचे निर्देश महापालिकेचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिले आहे. पावसामुळे खड्डे भरण्याच्या कामात अडचणी निर्माण होत आहेत. नागरीकांच्या सुविधेसाठी महानगरपालिकेने खड्डयांच्या तक्रारींसाठी आता 18002330045 हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला असून नागरीकांनी या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून खड्डयांविषयी तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन महानगरपालिकेच्या शहर अभियंता विभागामार्फत करण्यात येत आहे.
Tags
महाराष्ट्र