पालिकेच्या कार्यालयाजवळीलच घटना
शाळकरी विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढून दुसऱ्या बसमध्ये बसविले.
डोंबिवली ( शंकर जाधव ) रस्त्यावर खड्डे पडल्याने ते बुजविणे आवश्यक असताना वारंवार सांगूनही खड्डे बुजवूले जात नसल्याने शाळेच्या बस फुटपाठवरील झाकण नसल्याने गटारात अडकल्याची घटना मंगळवारी दुपारच्या दरम्यान डोंबिवली पश्चिमेकडील दोन पाण्याची टाकीजवळील पालिकेच्या 'ह' प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोर घडली.या बसमध्ये शाळकरी विद्यार्थी असल्याने त्यांच्या मदतीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी प्रमोद कांबळे धावून आले.कांबळे यांनी विद्यार्थ्यांना सुखरूपपणे बसबाहेर काढून दुसऱ्या बसमध्ये बसविण्यात आले. अग्निशमनच्या मदतीने बस बाहेर काढण्यात आली.
डोंबिवली पश्चिमेकडील दोन पाण्याची टाकी जवळील पालिकेच्या 'ह' प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या बाजूकडील रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिक पुरते वैतागले आहेत.या रस्त्यावरून शाळेच्या अनेक बसेस धावत असतात.मंगळवारी दुपारच्या सुमारास एका खाजगी शाळेची बस जात असताना खड्ड्यामुळे फुटपाथवर चढली असता फुटपाथला झाकण नसल्याने त्यात अडकली.सुदैवाने बस एका बाजूला पलटी झाली नाही.या बसमध्ये विद्यार्थी असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी प्रमोद कांबळे हे मदतीला धावते.कांबळे यांनी विद्यार्थीना सुखरूप बसच्या बाहेर काढून दुसऱ्या बस मध्ये बसविले.
या घटनेबाबत कांबळे म्हणाले, य रस्त्यावर खूपच खड्डे असल्याने अपघात होण्याची शक्यता असून खड्डे लवकरात लवकर बुजवा असे मी अनेक वेळेला 'ह''प्रभाग क्षेत्र कार्यालयाला कळविले होते.मात्र अधिकारी वर्गानी याकडे लक्ष दिले नाही.आज या घटनेत सुदैवाने कोणाला इजा झाली नाही.पण याला जबाबदार प्रशासन असून 'ठेच लागली की शहाणपण'अशी अवस्था झाली आहे.
दरम्यान , पालिका प्रशासनाने वेळीच या रस्त्याकडे लक्ष दिले असते तर ही घटना टळली असती पण लक्ष न दिल्याने शाळेची बस या खड्डमुळे अडकली.याची प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.