विश्वचषक स्पर्धेचे आतापासून बुकींग सुरू
अहमदाबाद : एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत - पाकिस्तान सामना 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमव खेळविला जाणार आहे. या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या सामन्याची क्रेझ एवढी आहे की, आतापासून बुकींग सुरू झाली असून हॉटेलमधल्या सर्व रूम्स बूक झाल्या आहेत पण नागरिकांची गर्दी काही कमी होताना दिसत नाही.
विश्वचषक सामन्याला आणखी तीन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. मात्र. विश्वचषक वेळापत्रकाची घोषणा झाल्यानंतर सामन्याच्या दिवसाच्या आसपास अहमदाबादमधील हॉटेलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे प्रेक्षकांना विश्वचषक चांगलाच महागात पडू शकतो. क्रिकेट चाहत्यांना राहण्याची सोय करण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. अहमदाबादमधील हॉटेलच्या खोल्या आधीच पूर्ण बुक झालेल्या आहेत. आश्चर्य म्हणजे, यांच्या किमती दीड लाखांपेक्षा जास्त आहेत.
हॉटेलच्या खोल्यांची महागाई केवळ अहमदाबादपुरती मर्यादित नाही. शेजारच्या शहरांमध्येही हॉटेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अहमदाबादपासून केवळ एक तासाच्या अंतरावर असलेल्या वडोदरामधील हॉटेल बुकिंगचे भाडे सामान्य दरापेक्षा सहा ते सात पटीने वाढले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॉटेल्समध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी 10 पट जास्त भाडे आकारले जात आहे. हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी एक लाख रुपयांपर्यंत पैसे घेतले जात आहेत.
एका मीडिया रिपोर्टनुसार, तीन महिन्यांआधी हॉटेल बूक केले तरी एका रात्रीच्या मुक्कामासाठी पंचतारांकित हॉटेल ५० हजार रुपये भाडे आकारत आहेत. वर्ल्डकप वेळापत्रक जाहीर होण्याआधी हॉटेल रुमचे भाडे ६,५०० ते १०,५०० रुपयांपर्यंत होते.