आता आम्ही सुरक्षित आहोत

 


 नांदवली रोड समर्थ नगरवासीयांनी मानले खासदारांचे आभार 

डोंबिवली ( शंकर जाधव ) : दरवर्षी पावसाळ्यात डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली व पीएण्डटी कॉलनी विभागात पावसाळ्यात पाणी तुंबत असल्याने येथील नागरिकच नव्हे तर रिक्षाचालकाही संतापले होते.पूर्वी ग्रामपंचाय आणि नंतर महापालिका प्रशासन जुजबी कामे करून यावर उपाय शोधायचे पण तरीही पूरपरिस्थितीत काहीही फरक पडत नव्हता. नाईलाज म्हणून आणि स्वतःचे घर म्हणून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने नांदीवली रस्त्याचे काँक्रिटीकरण व भूमिगत मोठी ड्रेनेज पाईपलाईनचे मजबूत काम केल्याने पावसाळ्यात पाणी तुंबणे यावर मात करण्यात आली आहे. यामुळे अखेर वर्षानुवर्षे नांदिवलीत पाणी तुंबण्याला प्रश्न सुटला असून नांदवली रोड समर्थ नगरमधील लोकं पावसाळ्यात सुखावले आहेत.

गेली वीस वर्ष प्रत्येक पावसाळ्यात येथील रहिवासी पावसाळ्यामध्ये पाणी तुंबल्यामुळे प्रचंड हाल सोसत होते. पाऊस पडला की येथील रस्ता नदीसारखा वाहू लागे व जवळजवळ आठ ते दहा हजार नागरिकांचा शहराशी संपर्क बंद होत होता. सभोवती पाणी तुंबल्याने कोणतीही आपत्ती नको म्हणून वीज वितरण कंपनी वीजप्रवाह बंद करीत असे. मुलांना शाळेत जाणे कठीण होत होते नसे. जेष्ठ नागरिक व रुग्ण यांचे यामुळे प्रचंड हाल होत. गटारांचे घाण सर्व रस्त्यावर साचे परिणामी आरोग्याचा प्रश्न होत असे. या घाणीमुळे डेंग्यू, मलेरिया आदी आजार प्रथम या विभागात जोर धरत. अशा या पावसाच्या हंगामात पाणी तुंबण्याच्या त्रासातून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या ठोस कामामुळे आता नांदिवली व पीएण्डटी कॉलनी सुख मिळाले आहे असे खुद्द नागरिक सांगत आहेत.

गेल्या पावसाळ्यात खासदार डॉ. शिंदे यांनी येथील नागरिकांना आश्वासन दिले होते की पुढच्या पावसाळ्याच्या आत तुमची पाणी तुंबणे ही समस्या कायमस्वरूपी निकाली लागेल. त्याप्रमाणे त्यांनी एमएमआरडीए माध्यमातून सर्वोदय पार्क ते नांदिवली नाला हा जवळ-जवळ 1 किलोमीटर लांबीचा व 50 फूट रुंदीचा असा भला मोठा हा नाला, आऊटलेट रस्ता काँक्रिटीकरण काम पूर्ण यामुळेच पुराच्या पाण्यापासून नागरिकांची कायमची सुटका झाली आहे.

आता मुसळधार पाऊस पडल्यावर पूर्वी आमच्या मनात धडकी भरत असे व धास्ती वाटे की आता आपल्याला पुन्हा प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागणार परंतु आता येथील विकासकामामुळे आमची हि धास्ती कायमची मिटली. मुसळधार पाऊस होऊनही नांदिवली रोडवर पाणी साचले नाही यामुळे आता दुकानदार, भाजी विक्रेते आणि रहिवाशांना पावसाळ्यात त्रास होणार नाही. याबाबत विभागातील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे, सचिव संतोष चव्हाण, गजानन व्यापारी, पदाधिकारी प्रकाश माने, उमेश पाटील, अनिल म्हात्रे, धनंजय म्हात्रे, अशोक केसरकर, सुनील म्हात्रे, प्रवीण म्हात्रे, सुरेश पाटील यांच्यासह परिसरातील लोकांनी या विकास कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.





Post a Comment

Previous Post Next Post