लेन्‍सकार्टद्वारे मुंबईतील १००व्या स्‍टोअरचा शुभारंभ*

हिरानंदानी, ठाणे येथे नवीन अद्ययावत दालन सुरू 

मुंबई : लेन्‍सकार्ट या भारतातील आघाडीच्‍या आयवेअर रिटेल ब्रॅण्‍डने मुंबईमध्‍ये त्‍यांच्‍या १००व्‍या स्‍टोअरच्‍या शुभारंभाची अभिमानाने घोषणा केली आहे. बहुप्रतिक्षित प्रमुख स्‍टोअर हिरानंदानी रोड, ठाणे येथे स्थित आहे आणि ग्राहकांना दर्जात्‍मक आयवेअर व अपवादात्‍मक शॉपिंग अनुभव देण्‍याच्‍या लेन्‍सकार्टच्‍या प्रवासामधील मोठा टप्‍पा आहे. ११ ऑगस्‍ट २०२३ रोजी स्‍टोअर उद्घाटन समारोहाचे आयोजन करण्‍यात आले. 

लेन्‍सकार्टचे सह-संस्‍थापक अमित चौधरी म्‍हणाले, ''हिरानंदानी रोडवर प्रमुख स्‍टोअरच्‍या लॉन्चमधून लेन्‍सकार्टची विस्‍तारीकरणाप्रती कटिबद्धता दिसून येते, तसेच समुदायाच्‍या वैविध्‍यपूर्ण आयवेअर गरजांची पूर्तता करण्‍याप्रती त्‍यांची समर्पितता देखील दिसून येते. आयग्‍लासेस्, सनग्‍लासेस् व कॉन्‍टॅक्‍ट लेन्‍सेसच्‍या व्‍यापक श्रेणीसह लेन्‍सकार्ट दृष्‍टी व स्‍टाइल वाढवण्‍याकरिता फॅशन-फॉरवर्ड निवडी व नाविन्‍यपूर्ण तंत्रज्ञान प्रदान करते.”

लेन्‍सकार्टची विकासगाथा उल्‍लेखनीय आहे, जेथे देशभरात त्‍यांचे १५०० हून अधिक स्‍टोअर्स आहेत. मुंबईत लेन्‍सकार्टने १०० हून अधिक स्‍टोअर्स स्‍थापित केले आहेत, ज्‍यामुळे आयवेअर उत्‍साहींसाठी मुंबई शहर पसंतीचे गंतव्‍य बनले आहे. अधिक पुढे जात लेन्‍सकार्टची आर्थिक वर्ष २५ पर्यंत शहरामध्‍ये आणखी ५० स्‍टोअर्स सुरू करण्‍याची महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्‍यामधून प्रमुख आयवेअर रिटेलर म्हणून कंपनीचे स्‍थान अधिक दृढ होते.



Post a Comment

Previous Post Next Post