डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपण

जळगाव: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव “ मेरी मिट्टी मेरा देश ” (मिट्टी को नमन, वीरों को वंदन) या अभियानाअंतर्गत आज दि. ११ ऑगस्ट रोजी श्री. ग. गो. बेंडाळे विद्यालय विवरे ता. रावेर जि.जळगाव आणि डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपणाचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाला डॉ.  उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीदुत विद्यार्थी रोहित गोपाल कोळी,उल्हास राजेंद्र पाटील, रोहित मधुकर पवार, संदीप कुमार मोठे यांच्या सह विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एच.वायकोळे सर विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि इ.१ते इ.१० चे सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. 

या प्रसंगी गावातील नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांनी,नागरिकांनी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आणि कृषीदुत विद्यार्थ्यांनी वृक्षरोपण केले आणि वृक्षरोपणाचा घोषणा दिल्या "वनीकरणात द्या साथ गावाचा करा विकास" 'जेव्हा होईल झाडांमध्ये वृध्दी तेव्हाच वाढेल जीवनात समृद्धी' 'झाडे लावा झाडे जगवा' या घोषणांनी परिसर दुमदुमला होता नंतर डॉ.  उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीदुत विद्यार्थी रोहित गोपाल कोळी यांनी विद्यार्थ्यांना वृक्षरोपणाचे महत्त्व पटवून सांगतांना ते म्हणतात 

 वाढत्या प्रदूषणाच्या काळात वृक्षरोपण हे महत्वाचे आहे गेल्या कोरोना काळात प्राणवायू अभावी नागरिकांचे झालेले मृत्यु हे आपण पाहिले यावरून झाडांनी दिलेला प्राणवायू किती महत्त्वाचा आहे हे आपल्या लक्षात आले असेल माणसाला वृक्षारोपणापासून बरेच फायदे होतात. झाडांच्या फळा-फुलांमुळे सुस्त ठिकाणेही सुंदर बनतात. झाडांची हिरवळ मनाला प्रसन्न करते. त्यांच्या मस्त सावलीने उन्हाळ्याच्या दुपारी आनंद मिळतो. त्यांची फुले, पाने आणि लाकूड आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. 

झाडांपासून कागद, डिंक, भौतिक औषधे आणि तेल इत्यादी मिळते. वृक्षारोपण हे वैज्ञानिक आणि भौगोलिकदृष्ट्या देखील महत्त्वपूर्ण आहे. झाडे वातावरण थंड आणि शुद्ध करतात. शुद्ध हवा लोकांना निरोगी बनवते. वृक्षांच्या आकर्षणामुळे पावसाचे ढग येतात आणि दुष्काळाची भीती दूर होते. शेताभोवती झाडे लावल्यास पावसात शेताची मातीचे संरक्षण होते आणि धान्याचे उत्पादन वाढते. रस्त्यांच्या कडेला झाडे लावल्याने त्यांचे सौंदर्य वाढते आणि लोकांना सावली मिळते.

 निसर्गाने बनविलेले एक झाडही निरुपयोगी नाही. वृक्षारोपण करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. ते आयुष्य निरोगी, सुंदर आणि आनंदी बनवते. दरवर्षी वनमहोत्सव साजरा करून प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी या योजनेत आपले सहकार्य केले पाहिजे. आज आपल्याला वृक्षारोपणाचे महत्त्व समजू लागले आहे हे आनंददायक आहे. सध्या गाव खेड्यापासून ते मोठ मोठी शहरांमध्ये “वृक्षारोपण” सप्ताह साजरी केली जात आहेत याचा मनस्वी आनंद वाटतो. कोळी यांनी सांगितलेल्या माहितीमुळे गावातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षरोपणासंदर्भात जनजागृती झाली.

  ग्रामीण जागरूकता कार्यनुभव कार्यक्रम 2023 - 2024  या साठी डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. शैलेश तायडे सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम. गोणशेटवाड सर , कार्यक्रम अधिकारी प्रा.व्हि. एस.पाटील सर व संबंधित विषयातील विषय विशेष तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला...

Post a Comment

Previous Post Next Post