नागपूर: भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणी कुख्यात दारु माफिया आणि वाळू तस्कर अमित ऊर्फ पप्पू शाहूला अटक करण्यात आली आहे. त्याला मनकापूर पोलीस ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने जबलपूर पोलिसांच्या सहकार्याने जबलपूरमध्येच अटक केली. लवकरच त्याला नागपूर पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहेत. अमित साहूने आठ दिवसांपूर्वी जबलपूरमध्ये सना खान यांची हत्या केली. त्यानंतर सना खानचा मृतदेह हिरण नदीत फेकल्याची पोलिसांना कबूली दिली. सना खान यांच्या हत्येनंतर अमित फरार झाला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार २ ऑगस्टच्या दुपारपासून सना खान बेपत्ता होत्या. भाजप नेत्या सना खान २ ऑगस्ट रोजी जबलपूरमध्ये त्यांचा मित्र अमित उर्फ पप्पू साहूला भेटायला गेल्या होत्या. तो त्यांचा बिझनेस पार्टनरही होता. त्या अमितच्या घरी राहत होत्या. अमितचा ढाबाही तिथेच आहे. सना खान जबलपूरला गेल्या असताना त्यांचे अमित साहू सोबत कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर अमित साहूने सना खानच्या डोक्यावर वार करून खून केला. त्यानंतर मृतदेह हिरन नदीत फेकून दिली अशी प्राथमिक आरोपीने पोलिसांना दिली.
सना खान यांना जबलपूर येथील एकाने जीवे मारण्याची धमकी दिली होती. जबलपुरला गेल्याच्या दोन दिवसानंतर त्यांचा संपर्क होत नसल्याने सना खानच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मानकापूर पोलिसांचे पथक तपासासाठी जबलपूरला जाताच अमित साहू फरार झाला होता. त्याचा नोकरही तेथून पळून गेला होता. अखेर पोलिसांनी अमितचा नोकर जितेंद्र गौर याला अटक केली आहे.
# भाजप नेत्या सना खान हत्या # मनकापूर पोलीस ठाणे गुन्हे शाखेचे यश # आरोपी अमित ऊर्फ पप्पू शाहूला अटक