रिक्षा बंदचा इशारा
डोंबिवली ( शंकर जाधव ) : हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांवर कर्जचा डोंगर असताना कधी बँकेतून तर कधी सावकारी कर्जवसुलीसाठी तगादा लावला जातो. त्यात वाहतूक पोलिसांकडून अन्यायकारक दंड वसुली केली जात असल्याचा आरोपी करत शुक्रवारी डोंबिवली पश्चिमेला स्टेशनबाहेरील परिसरात रिक्षा चालक मालक संघटनेने रिक्षाचालकांनी एकत्र येऊन वाहतूक पोलिसांचा निषेध नोंदविला.
वाहतूक पोलिसांनी डोंबिवली पश्चिमेकडे लक्ष द्यावे अन्यथा दोन दिवसानंतर डोंबिवली पश्चिमेला रिक्षा बंद आंदोलन करू असा इशारा रिक्षा चालक मालक संघटनेने दिला आहे. वाहतूक पोलिसांच्या मनमानीपणा, सकाळी सात वाजता वाहतूक पोलीस कर्त्यव्य बजावीत असताना दिसत नाही, डोंबिवली पश्चिमेचे शहरी पोलीस दिवसा गस्त घालत नाहीत, वाहन परवाना तपासणी न होणे, परवाना नसलेल्या वाहनचालकांवर कारवाई का होत नाही ? बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई का होत नाही ? अशा रिक्षाचालकांना वाहतूक पोलीस सावध करत असतात हा प्रकार डोंबिवली पश्चिमेला दिसत असल्याने शुक्रवारी स्टेशन बाहेरील परिसरात रिक्षाचालक मालक संघटनेनेचे शेखर जोशी, भिकाजी धाडे ,विश्मभर दुबे यांसह अनेक रिक्षाचालकांनी वाहतूक पोलिसांचा निषेध नोंदविला. याबाबत उपाध्यक्ष शेखर जोशी म्हणाले, डोंबिवली पश्चिमेला वाहतूक पोलीस काम व्यवस्थित करत नाहीत.अनेक वेळेला वाहतूक पोलिसांना सांगूनही यात बदल होत नसल्याने अखेर आम्हांला वाहतूक पोलिसांचा जाहीर निषेध करावा लागला.