नॅशनल व्हॅस्कुलर डे निमित्त २६ शहरांमध्ये वॉकथॉनचे आयोजन


 

ठाणे :  चेन्नई येथे ६ ऑगस्ट १९९४ रोजी स्थापन झालेल्या व्हॅस्कुलर सोसायटी ऑफ इंडियाने आज देशभरात नॅशनल व्हॅस्कुलर डे साजरा केला. यानिमित्ताने मुंबईसह भारतातील २६ शहरांमध्ये 'अॅम्प्युटेशन फ्री इंडिया' या थीमसह वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले असून, 'हसत जगण्यासाठी एक मैल चाला' या संदेशासह जनजागृती देखील करण्यात आली. होरायझन प्राइम हॉस्पिटल, घोबबंदर रोड ते ब्रह्मांड, ठाणे पश्चिमेपर्यंत या वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिट इंडियाच्या व्हिजनला अनुसरून, व्हीएसआय ने खालच्या अवयवांचे आजार (मधुमेह, धूम्रपान, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल) टाळण्यासाठी आरोग्य सेवा, जागरूकता वाढवणे आणि वेळेवर हस्तक्षेप करणे यावर राष्ट्रीय उपक्रम सुरू केला आहे. याकडेच लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. रितेश गायकवाड आणि डॉ. परेश पै, वरिष्ठ व्हॅस्कुलर शल्यचिकित्सक आणि मुख्य संयोजक, मुंबई - व्हॅस्क्युलर सोसायटी ऑफ इंडिया म्हणाले, “मुंबईतील आमच्या मोहिमेला मिळालेल्या अप्रतिम प्रतिसादामुळे आम्ही खूप प्रोत्साहित झालो आहोत. सर्वसमावेशक रक्तवहिन्यासंबंधी आरोग्य सेवा वितरण प्रणालीद्वारे निरोगी समुदायांना प्रोत्साहन देणे हे आमचे ध्येय आहे, ज्यामुळे ‘एम्पुटेशन फ्री इंडिया’चे वचन पूर्ण होईल. आज, नॅशनल व्हॅस्कुलर डे निमित्त, देशभरातील २६शहरांमध्ये एकाच वेळी वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये ८,००० हून अधिक स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी प्रसिद्ध व्हॅस्कुलर सर्जन डॉ. विनीत पालीवाल आणि डॉ. वीरेंद्र यादव यावेळी उपस्थित होते.

ही राष्ट्रीय मोहीम आजच्या काळात अधिक समर्पक बनली आहे, जेव्हा भारत वेगाने जगाची मधुमेहाची राजधानी बनत चालला आहे. अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि आहारामुळे अधिकाधिक लोकसंख्येला टाळता येण्याजोगे अंगविच्छेदन होण्याचा धोका आहे. देशव्यापी जागरूकता निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न आहे, जेणेकरून जीवनशैलीत बदल करून या अंगविच्छेदनांना प्रतिबंध करता येईल आणि गरज पडल्यास उपचार लवकर करता येतील, जेणेकरून त्यांचे जीवनमानही राखता येईल.Post a Comment

Previous Post Next Post