डोंबिवलीत रान भाज्या, मिलेट्स फूड महोत्सव



रानभाज्या आणि मिलेटसचा आहारातील वापर वाढाण्यासाठी
जनजागृती

डोंबिवली ( शंकर जाधव ) : आपल्या आहारामध्ये बऱ्याच प्रमाणात बदल झाला आहे . जीवनशैलीतील बदलामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. मधुमेह रक्तदाब हृदयविकार इत्यादींचे प्रमाण वाढत आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांना रानभाज्या आणि मिलेटस म्हणजे तृणधान्य्यांचे महत्व कळावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ठाणे कृषी विभाग व डोंबिवली रोटरी क्लबच्या वतीने रानभाज्या आणि मिलेटस महोत्सव डोंबिवली येथे पहिल्यांदा आयोजित करण्यात आला आहे.या भाज्यासाठी कुठल्याही रासायनिक खतांचा, किटकनाशकांचा किंवा तणनाशकांचा वापर केलेला नाही.
यामध्ये पौष्टिक आणि औषधी  घटक असल्याने आरोग्यासाठी उपयोगी आहे.त्याचबरोबर गरीब आदिवासींना त्यातून अर्थार्जन हा महोत्सव आयोजित करण्यामागचा उद्देश आहे.तसेच आपल्या आहारात गहू तांदूळ यांचे प्रमाण वाढल्याने मधुमेह रक्तदाब या असाध्य रोगांचे प्रमाण वाढले त्यामुळे मिलेटस म्हणजे तृणधान्य बाजरी, ज्वारी, नाचणी , वरी यांचा वापर केला पाहिजे.यामध्ये रक्तातील साखर होण्याचे प्रमाण कमी आहे.तंतुमय - फायबरचे प्रमाण जास्त असते.यामध्ये कॅल्शियम - आयन असते. ही तृणधान्य काटक असून  यांचे उत्पादनासाठी कमी पाणी लागते.हे इकोफ्रेंडली असून , सुपर फूड किंवा स्मार्टफूड म्हणून ओळखली जाते.शासनाने ' श्री ' धान्यं असे असे नामकरण केले आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे जंकफूडचे आहारातील प्रमाण वाढले आहे.त्यामुळे रानभाज्या आणि मिलेटसचा आहारातील समावेश आवश्यक आहे.त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून आदीवासी बांधव रानभाज्या विक्री साठी येतात.त्यांचे देखील अर्थार्जन व्हावे . रानभाज्या आणि मिलेटसचा आहारातील वापर वाढाण्यासाठी जनजागृती करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे अध्यक्ष गोखले यांनी सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post