अरेट्टो’चे पुण्यात पहिले ब्रँड आउटलेट सुरू

पुणे : लहान मुलांच्या फुटवेअरमधील अग्रगण्य ब्रँड अरेट्टोने पुण्यातील फिनिक्स मार्केटसिटीमध्ये आपले पहिले फ्लॅगशिप स्टोअर सुरु केले आहे. हा धोरणात्मक टप्पा अरेट्टोच्या डिजिटल सुरुवातीपासून प्रत्यक्ष खरेदीचा अनुभव देण्यापर्यंतचा बदल दर्शवितो. मुलांसाठी नावीन्यपूर्ण नवकल्पना शोधणार्‍या आधुनिक पालकांसाठी सर्वांगीण ग्राहक अनुभव देण्याची आपली वचनबद्धता या ब्रँडने कायम ठेवली आहे.

अरेट्टोचे सीईओ सत्यजित मित्तल म्हणाले, “आम्ही समर्पित डिजिटल चॅनेलद्वारे विक्री सुरू केली, त्याच बरोबर पुण्याच्या आसपासच्या ग्राहकांसाठी प्रत्यक्ष खरेदीचा अनुभव देण्यासाठी स्टोअर सुरू केले. त्याला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे आमचा स्टोअरच्या माध्यमातून विक्री करण्यातील आत्मविश्वास वाढला. आमच्या ऑफरचा लाभ घेण्याच्या संधीसह मुलांना अरेट्टोचे शूज घातल्यानंतर मिळणारा आराम, त्यांच्या म चेहऱ्यावर झळकणारा आनंद पाहणे हा आमचा दृष्टीकोन आहे. चाचण्यांच्या सामर्थ्यावर आमचा ठाम विश्वास आहे; मुलांनी एकदा आमच्या उत्पादनाचा अनुभव घेतला, की त्याच्या गुणवत्तेबद्दल पालकांना खात्री पटवणे अधिक सोपे होते."

एका वर्षाच्या कालावधीत अरेट्टोने नाविन्यपूर्ण डिझाइनसाठी आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी ओळख मिळवली आहे. तंत्रज्ञानासाठी पेटंट मिळवण्या सह किड्स आणि एकूण श्रेणीमध्ये २०२३ मध्ये ग्लोबल फूटवेअर पुरस्कार जिंकण्याची कामगिरी कंपनीने केली आहे. प्रमुख डिजिटल मार्केटप्लेसमध्ये अरेट्टोने धोरणात्मक विस्तार केला असून, नायका आणि अमेझॉनवर आपली मजबूत उपस्थिती दर्शविली आहे. मुलांच्या स्पर्धात्मक फुटवेअर श्रेणीतील बेस्टसेलर पुरस्कार आणि अमेझॉनच्या चॉईस टॅगसह विविध प्रतिष्ठित पुरस्कारही या ब्रँडने मिळवले आहेत.

डिजिटल मार्केटसह अरेट्टोने स्टोअरच्या माध्यमातून प्रत्यक्ष खरेदीचा अनुभव देण्यातही आघाडी घेतली आहे. हे या ब्रँडचे मुख्य आकर्षण आहे. अरेट्टोने देशातील पाचपेक्षा अधिक शहरांमध्ये प्रदर्शने, कार्यशाळा, फ्ली बूथ, पॉप अप यांसारख्या विविध इव्हेंट्सचे एकूण १०० दिवस आयोजन केले आहे. एक लखापेक्षा जास्त पालकांपर्यंत पोहोचून त्यांना हा ब्रँड अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी दिली आहे. तसेच सर्वोत्तम उत्पादने तयार करण्यासाठी संशोधन आणि विकास करण्यासाठीही चालना दिली आहे. या हँड-ऑन पध्दतीने एक उल्लेखनीय चाचणी-ते-रूपांतरण याचे ५० टक्के गुणोत्तर प्राप्त केले आहे.

मॉल्स, विमानतळ, हायस्ट्रीट्स इत्यादींसह विविध रिटेल ठिकाणी आपली उपस्थिती व्यापक करत जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने पोहोचवण्याचे अरेट्टोचे उद्दिष्ट आहे. आपल्या प्रवासाच्या आगामी टप्प्यात, अरेट्टो विशिष्ट रिटेल फॉरमॅट्समध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. वेगवेगळ्या ग्राहकांची अपेक्षा पूर्तता करण्यासाठी कंपनी सज्ज आहे. 

अरेट्टोची खास ब्रँड आऊटलेट्स ही कंपनीची नाविन्यपूर्ण फूटवेअर श्रेणीचे सादर करण्यासाठी एक समर्पित जागा आहेच, त्याशिवाय ब्रँडची दृश्यमानता आणि सुलभता आणखी वाढवण्यासाठी मल्टी-ब्रँड आउटलेट्समध्ये इतर ब्रँड्सच्या बरोबरीने अरेट्टोची उत्पादनेदेखील उपलब्ध करण्यात आली आहेत. ग्राहकांना कंपनीच्या ऑफर्सचा सहजतेने लाभ घेता यावा यासाठी एक सोयीस्कर व्यासपीठ प्रदान करण्याकरिता शॉप-इन-शॉप आणि किओस्क स्थापन करण्याची कंपनीची योजना आहे.



Post a Comment

Previous Post Next Post