ब्रह्माकुमारीज विश्व विद्यालयातर्फे कामगार दिन मोठ्या उत्साहात

  



अंबरनाथ \ अशोक नाईक : कामगार आणि कामगार वर्गांच्या योगदानाला आदराने गौरवण्यासाठी दरवर्षी १ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो.गुरुवार, १ मे रोजी कामगार दिनी कामगारांच्या योगदानाला उजाळा देण्यासाठी ब्रह्माकुमारीज अंबरनाथ केंद्राच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी शहरातील विविध क्षेत्रातील कामगार उपस्थित होते. महावितरण, नगरपालिका, हॉस्पिटल, ऑर्डनन्स फॅक्टरी इत्यादी संस्थेतून मदतनीस, मुकादम, स्वच्छता कामगार, आरोग्य सेविका, वीज कामगार, गवंडी, प्लंबर, बिगारी इत्यादी कामगार उपस्थित होते. 


व्यसन आणि तणावापासून स्वतःला मुक्त करून आपले जीवन आनंदी बनवण्यासाठी ईश्वरीय ज्ञान सर्वांसाठी आवश्यक आहे. याची जाणीव करून सर्वानी या ज्ञानाचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्राच्या संचालिका बीके मंगला बहेनजी यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरवातीस बीके तनुजा बहेनजी यांनी सर्वांचे स्वागत करून संस्थेची ओळख करून दिली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त ' व्यसनमुक्ती ' ही लघुनाटिका सादर करण्यात आली. 

या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित शिवसेना शहर उपप्रमुख पुरुषोत्तम उगले, माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांनीही कामगार दिनानिमित्त आपले विचार मांडत उपस्थित कामगारांचा उत्साह वाढवला. सर्व कामगारांचा भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जवळपास १२५ महिला आणि पुरुष कामगार उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post