अपघातानंतर प्रशासनाकडून गतिरोधकाला पांढरे पट्टे

डोंबिवली ( शंकर जाधव ) : ठेच लागल्यावर शहाणपण अशी म्हण प्रशासनाला तंतोतंत लागू होते.डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी निवासी भागात काँक्रीटीकरण रस्त्यावर गतीरोधक तर बनविले पण पांढरे पट्टे रंगविले नव्हते.त्यामुळे वाहनचालकांना गतीरोधकाचा अंदाज येत नसल्याने अपघात झाले.दोन दिवसात दुचाकीस्वार या रस्त्यावर पडून जखमी झाले होते.

समाजसेवक राजू नलावडे व नागरिकांनी यावर आवाज उठविल्यावर या रस्त्यावर एमएमआरडीएनकडून गतिरोधकाला पांढरे पट्टे रंगविल्यात आले. डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी विभागात दुचाकीवरून जात असताना दुचाकीस्वाराला गतीरोधकाचा अंदाज न आल्याने एक महाविद्यालयीन विद्यार्थी उमेश कोंडालकर हा पडून जखमी झाला होता.ही घटना शुक्रवारी सकाळी साड़े वाजण्याच्या सुमारास घडली होती.गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास याच ठिकाणी दुचाकीवरून पडून घनश्याम हे जखमी झाले होते.



Post a Comment

Previous Post Next Post