ग.गो.बेंडाळे महाविद्यालयाचा वर्धापनदिन साजरा

जळगाव: विवरे ता.रावेर जि. जळगांव येथे ७६ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ७.१५ वा. सरपंच स्वरा पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच ग.गो.बेंडाळे महाविद्यालयात सकाळी ७.३०वा विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एच.वायकोळे यांच्या सुभहस्ते करण्यात आले.   यावेळी, कृषी अधिकारी प्रीती सरोदे, पोलीस विभागाचे अधिकारी , डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी कृषीदुत रोहित कोळी,उल्हास पाटील, संदीप मोठे,रोहित पवार यांच्या सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावात प्रभातफेरी काढली "भारत माता की जय" "जय जवान जय किसान" अश्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी गावातील परिसर दणाणून सोडला प्रभातफेरी आटोपल्यावर विद्यालयात छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.  यावेळी डॉ उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीदुत विद्यार्थी मा.रोहित कोळी हे आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणतात आज आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा व अभिमानाचा आणि मानाचा दिवस आहे. अशा या क्रांतिकारी शुभदिनी प्रथम सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 होय, हाच तो दिवस ज्या दिवशी भारत भूमीतील असंख्य सुपुत्रांच्या प्राणाच्या बलिदानाच्या आहुतींनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतीयांची सुटका होऊन भारतीयांना प्रथमच स्वातंत्र्याची चव चाखायला मिळाली होती.

भारतीय जनता, थोरपुरुष, क्रांतिकारकांच्या अथक प्रयत्नांतून व आत्मबलिदानातुन स्वातंत्र्याचा सुखकर दिवस भारतीयांच्या जीवनात उजाडला होता , त्यामुळे समस्त भारतीयांकरिता हा अतिशय आनंददायी व अविस्मरणीय असाच दिवस आहे.

15 ऑगस्ट 1947 पूर्वी भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत सुमारे दीडशे वर्षे होता. इंग्रजांच्या दिलेल्या असमानतेचा वागणुकीचा, भेदभाव आणि सक्तीचे नियम यांच्यामुळे अनेक शूर वीर स्वातंत्र्य दिन भारतीयांच्या मनामध्ये एकतेची भावना निर्माण होऊ लागली व देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे असे वाटू लागले.

याच कारणांमुळे देशातील अनेक स्वातंत्र्य सैनिक व समाज सुधारक विविध ठिकाणी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढे देऊ लागले. यामध्ये मोलाचे कार्य ,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक,भगतसिंग राजगुरू सुखदेव, चंद्रशेखर आजाद अशा कित्येक स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारकांनी त्यांच्यासोबत देशातील असंख्य अशा नागरिकांनी आपले प्राण पणाला लावले अशाप्रकारे भारताला स्वातंत्र्य मिळाले. 

भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७६वर्षे पूर्ण झालेली आहे. आणि या वर्षी आज आपण ७६ वा गणराज्य दिवस म्हणजे स्वातंत्र दिवस साजरा करीत आहोत. आज भारत देश जगामध्ये महासत्ता म्हणून ओळखला जाण्याची चिन्ह आहेत .भारत हा आपला देश सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे.स्वातंत्र्यानंतर आपल्या देशान वैद्यकीय क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानात आणि अनेक क्षेत्रामध्ये उत्तुंग प्रगती केली . परंतु असे असले तरी देशामध्ये अनेक समस्या आज आपल्याला दिसत आहे त्यामध्ये गरीबी, असमानता, भ्रष्टाचार,दंगली, स्रिया वरील होणारे अत्याचर आजही आपल्या देशामध्ये दिसून येत आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या देशांमधील युवा हा सोशल मीडिया, मोबाइल च्या गुलामगिरीत अडकत चाललेला आहे. यावर उपाय म्हणजे एकच देशातील सर्व नागरिकांनी जागे होऊन, या सर्व समस्यांवर मात केला पाहिजे. 

आपण भारत या देशाचे नागरिक या नात्याने आपल्या देशाला पुढे नेण्याचे व आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे आपले कर्तव्य आहे, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करून , ते व्यर्थ न जाऊ देता त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजे देशातील प्रत्येक नागरिक समान आहे असे मानून सर्व, आपापसातील वैर सोडून प्रत्येकाने देशाच्या प्रगतीसाठी एकत्र आले तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा होईल. व जगामध्ये देश महासत्ता म्हणून उदयास येईल. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक व देशभक्तांना विनम्र अभिवादन करत लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी व संविधानीक मूल्यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहण्याचा निश्चय करूया.

  यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता देशभक्तीपर गीत गायन करुन करण्यात आली.ग्रामीण जागरूकता कार्यनुभव कार्यक्रम 2023 - 2024 या साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समनव्यक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा व्हि.एस.पाटील व संबंधित विषयातील विषय विशेष तज्ञा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला...

Post a Comment

Previous Post Next Post