कुंफु कराटेच्या आंतरराष्ट्रीय फेरीत कल्याणच्या दिक्षा निकमची निवड

 


डोंबिवली  ( शंकर जाधव ) : कल्याण पूर्वेकडील १५वर्षीय दीक्षा निकम हिची अंतरराष्ट्रीय फेरी खेळण्यासाठी निवड झाली असून काही दिवसातच ती नेपाळ येथे जाणार आहे. ऑल  इंडिया कराटे असोसिएशन चॅम्पियनशिप कप २०२३ या स्पर्धेत कुंफु कराटे या खेळाच्या प्रकारात जिल्हा , राज्य, राष्ट्रीय या स्पर्धेच्या फेऱ्या तिने यशस्वीरीत्या पार केल्या आहेत. दिक्षाने  एकूण 15 मेडल्स , ट्रॉफी आणि प्रमाणपत्र मिळवली असून केवळ कुंफु कराटेच नव्हे तर ती लंगडी, खो खो , कबड्डी  आणि आट्यापाट्या हा खेळ खेळण्यातही पारंगत आहे. 

दिक्षाला  खेळ खेळताना पथ्य पाणी सांभाळावे लागते असे ती सांगते. कोल्ड्रिंक्स किंवा वेफर्स हे पदार्थ मी खात नाही. फळ, डाळ - भात , कडधान्ये, चणे हे  प्रोटीन्स मिळणारे सर्व पदार्थ खाते. दीक्षा ही कल्याण येथील अमेय वाघमारे यांच्याकडे कुंफु कराटेच्या प्रशिक्षणासाठी मी जाते. यावेळी रोज सकाळ संध्याकाळ 2 तास सराव करते. या व्यतिरिक्त धावणे , लंगडी, खोखो या खेळाचाही सराव करते.

 शाळेत असल्यापासूनच ती उत्तम खेळ खेळते असे तिचे शाळेतील शिक्षक सांगत. त्यानंतर काटकसर करून  तिला खेळासाठी प्रोत्साहन दिले आणि कुंफुं कराटे खेळ शिकण्यासाठी अजिंक्य वाघमारे यांच्याकडे पाठवले असे तिचे वडील अशोक निकम सांगतात. सध्या अशोक निकम हे महापालिकेचे निवृत्त कर्मचारी आहेत. मात्र मुलीच्या भविष्यासाठी आम्ही जीवन जगताना काटकसर करतो.  सध्या ती देशासाठी ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न रंगवत असून आम्ही तिला प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या महिला सुरक्षित नाहीत. मात्र कुंफु कराटे  शिकल्याने स्वतःची सुरक्षा स्वतः करू शकतो. त्यामुळे हा खेळ महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे सांगते.




Post a Comment

Previous Post Next Post