नागरिकांनी मानले आभार
डोंबिवली ( शंकर जाधव ) : रस्त्याच्या मधोमध गटाराचे झाकण तुटल्याने मंगळवारी यात रिक्षा अडकल्याचा प्रकार डोंबिवली पश्चिमेकडील उमेशनगर परिसरात घडली होती.येथील शिवसैनिक संदेश पाटील यांना सदर प्रकार समजताच त्यांनी पाहणी केली.उघड्या गटारावरील झाकणामुळे वाहनांचा अपघात होण्याची शक्यता असल्याने स्थानिकांनी पालिका प्रशासनातील संबधीत विभागाला संपर्क साधला होता पण पालिकेने लक्ष दिले नाही असे रहिवासी म्हणाले.उमेश नगर येथील मुख्य रहदारीच्या रस्त्यावरील लोखंडी ड्रेनेजचे झाकण अनेक दिवसापासून तुटले होते.
उमेश नगर नाका येथील रहदारी मोठ्या प्रमाणात असून वयस्कर माणसं ,लहान मुले किंवा एखादी गाडी अडकून मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे. याची खबरदारी घेणे गरजेचे होते म्हणून शिवसैनिक संदेश पाटील यांनी स्वखर्चाने गटारावर बंदिस्त लोखंडी झाकण लावले.पाटील यांच्या या समाजकार्याबद्दल येथील नागरिकांनी त्यांचे आभार मानले.