दिवा : ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरांमध्ये "दिव्यांग हयुमन राईट फेडरेशन" च्या वतीने इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा साजरा करण्यात आला. तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पदाधिकारी, समाजसेवक यांना त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून "मानव - सृष्टी समाजरत्न पुरस्कार" देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये दिव्यातील दिव्यांग, महिला व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन दिवा कमिटी पदाधिकारी, आयोजक चंद्रकांत पाटील, विराज धसाडे, विकास पवार, शर्मा आहिरे मॅडम, सुमन पवार मॅडम, रिटा मॅडम, शिंदे मॅडम, विजय आहिरे, प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक भरत जाधव सर, संजय सर, संतोष मोरे, रवींद्र देसाई, बाळकृष्ण मिळजोळकर, तसेच प्राध्यापिका उज्वला जाधव उपस्थित होते. त्यावेळी विद्यार्थ्यांना, दिव्यांगांना बहुजन वर्गाला न्याय देण्यासाठी "मानव सृष्टी के राइट्स" या यूट्यूब चैनलचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी व समाजसेवक शरद निकम, सचिन पाटील, प्रवीण उतेकर तसेच पत्रकार समाजसेवक चव्हाण यांना" मानव मानव सृष्टी समाज रत्न पुरस्कार" देऊन गौरवण्यात आला. तसेच दिव्यांग ह्यूमन राईट फेडरेशन पदाधिकारी यांना सुद्धा पुरस्कार देण्यात आला. त्याचप्रमाणे मान्यवरांचे भाषण झाल्यावर प्राध्यापक भरत जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना यूपीएससी एमपीएससी परीक्षेमध्ये कशाप्रकारे यश मिळवता येईल त्याचे मार्गदर्शन केले. तसेच दिव्यांग ह्यूमन राईट फेडरेशन हे भारत देशात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व तसेच औद्योगिक क्रांती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती जागृती करून सामाजिक परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे जनतेचे स्वराज्य व महापुरुषांचे आदर्श युक्त महाराष्ट्र तसेच भारत देश केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज देशाला खरी लोकशाहीची व तसेच विकासाची गरज आहे हे करण्यासाठी सर्व बहुजन वर्गाने प्रशासकीय सेवेमध्ये तसेच राजकीय व सामाजिक सेवेसाठी तत्पर रहाणे गरजेचे आहे, यासाठी प्रत्येकाने शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करून देश सेवा करण्यावर भर द्यावा, असे प्रबोधन करण्यात आले. तसेच संजय सर व जाधव मॅडम यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन संतोष मोरे यांनी केले .त्याचप्रमाणे सर्व समाजसेवकांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाल मोठ्या संख्येने महिला, विद्यार्थी, दिव्यांग व नागरिक उपस्थित होते.
Tags
महाराष्ट्र