डोंबिवली ( शंकर जाधव ) : न्यू सनराइज हायस्कूल मध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त व्यसनमुक्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला शाळेचे ट्रस्टी प्रभाकर रेड्डी , मुख्याध्यापक विजया , पाटील, नशाबंदी मंडळाचे सदस्य आकाश देसले, ठाणे जिल्हा संघटक रवींद्र गुरचळ या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात मार्गदर्शन आकाश देसले यांनी केले. तसेच ठाणे जिल्हा संघटक रविंद्र गुरचळ म्हणाले, व्यसन केल्यामुळे येणाऱ्या पिढी ही कॅन्सर, मती मंद, कुपोषित मुले जन्माला येऊ शकतात. शाळेचे ट्रस्टी यांनी सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. या कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते.
Tags
महाराष्ट्र