दिवा (आरती मुळीक परब) : मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा शहराच्या
हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंब्रा, निवृत्ती कोल्हटकर यांच्या
मार्गदर्शनाखाली गणपती उत्सवात मिरवणूका काढण्यात येतात तसेच मुंब्रा पोलीस
स्टेशन हद्दीत हिंदू, मुस्लिम अशी मिश्र वस्ती असल्या कारणाने कायदा व
सुव्यवस्थेच्या दृष्टीने शांतता अबाधित ठेवण्यासाठी रूटमार्च काढण्यात आला.
सदरचा रूटमार्च दिवा नाका ते दिवा रेल्वे स्टेशन, मुंब्रादेवी कॉलनीतुन
पुढे दिवा पोलीस चौकी समोरुन ग्लोबल येथून दिवा आगासन रोडवर येऊन परत दिवा
नाका येथे समाप्त करण्यात आला. सदर रूटमार्चमध्ये पोलीस अधिकारी १२, पोलीस
अंमलदार ३५ तसेच पी.सी. आर. २ मोबाईल पोलीस गाड्या असे मनुष्यबळ रूट मार्च
करिता नेमण्यात आले होते.
Tags
महाराष्ट्र