दिवा रेल्वे फाटक कायमस्वरुपी बंद
दिवा, (आरती मुळीक परब) : प्रचंड तीव्र इच्छाशक्ती आणि प्रामाणिक प्रयत्न असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते हे आज दिवा रेल्वे फाटक ओलांडणे (क्रॉसिंग) बंद झाले यावरुन दिसते. साधारण महिन्याभरापूर्वी वंदे भारत रेल्वेच्या वेळेत मुंब्रा येथे एका अपघातात एका व्यक्तीचा मृत्यु झाला. त्यामुळे ही ट्रेन तिकडेच १५/२० मिनटे खोळंबून राहिल्याने मागे इतर सर्व ट्रेन लेट झाल्या. वंदे भारत हा आदरणीय पंतप्रधानच महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असल्याने ताबडतोब डीआरएम स्वतः घटनास्थळी येऊन दखल घेतली आणि तसेच त्यांनी दिवा रेल्वे स्थानकाला भेट दिली. आणि त्यांनी स्वतः दिवा फाटकातून प्रवासी कसे जीव धोक्यात टाकून रूळ ओलांडताना पाहिले. त्वरित त्यांनी आरपीएफ अधिकारी गिरीशचंद्र तिवारी यांना रेल्वे फाटक क्रॉसिंग प्रवाशांना बंद करण्याचे आदेश दिले. त्यात तिवारींनी कोणतीही टोलवाटोलवी न करताना अगदी आत्मीयतेने त्यांनी स्वतः ग्राउंड लेवलवर उतरून त्यांच्या टीमला घेऊन बॅरिकेड्स लावून प्लॅटफॉर्मवरून रेल्वे रुळातून जाण्याचा मार्गच बंद केला.
फाटकातून कोणी रेल्वे रुळातून प्लॅटफॉर्म वर जाऊ नये म्हणून फाटक परिसरात आरपीएफचे पोलीस शिपाई उभे केले आणि त्याचाच परिणाम म्हणून आज गेल्या महिन्याभरात एकही प्रवासी रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेला नाही. याचे श्रेय पूर्णपणे रेल्वे डीआरएम आणि मुख्यत्वे आरपीएफ अधिकारी गिरीशचंद्र तिवारी व त्यांच्या पूर्ण टीमला जाते. त्यासाठी त्यांचा सन्मान व अभिनंदन करण्यासाठी संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजय भोईर, नवनियुक्त भाजप दिवा शीळ मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, शिवशक्ती रिक्षा युनियन अध्यक्ष विनोद भगत, समीर चव्हाण, प्रकाश पाटील, तुकाराम भोईर, दत्ता पाटील, प्रणव भोईर, निलेश भोईर इ. पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी विजय भोईर यांनी दिवा सीएसएमटी लोकल तातडीने चालू करण्यासाठी गरज पडल्यास आम्ही दिल्लीला जाऊन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटू आणि तरीही प्रश्न सुटणार नसेल तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटण्यास कचरणार नाही, असे त्यावेळी सांगितले.
