डोंबिवली ( शंकर जाधव ) : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कल्याण ग्रामीण विधानसभा व डोंबिवली शहर विधानसभा तर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून सर्व शाळा महाविद्यालय मध्ये जाऊन कृतज्ञता म्हणून मुख्याध्यापक, शिक्षक यांना भेटून शिक्षण क्षेत्रात देत असलेल्या योगदानाबद्दल विद्यार्थी या नात्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष मिलिंद मदन म्हात्रे यांनी सांगितले की, राज ठाकरे व अमित ठाकरे यांची नेहमी शिकवण आहे कि आपण सतत विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी काम केले पाहिजे त्यांचा आदर सत्कार केला पाहिजे. दरवर्षी गुरुपौर्णिमा व शिक्षक दिनाच्या दिवशी शाळा महाविद्यालयात आम्ही सर्व मनसैनिक जातो. आज देखील आम्ही शिक्षकांची भेट घेऊन आशिर्वादरूपी मार्गदर्शन घेतले आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नेहमीच शिक्षक विद्यार्थी व पालकांसोबत आहे असे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष मिलिंद मदन म्हात्रे, शहर संघटक तकदिर काळण, विभाग अध्यक्ष रोहित भोईर, विभाग सचिव प्रवीण पाटील, उपविभाग अध्यक्ष क्रांती पाटील, शाखा अध्यक्ष राजेश कासेकर, अजय पाटील, राज जमदाड यांच्यासह मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


