St accident: गणेशोत्सवासाठी डोंबिवलीहून राजापुरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात

 

एकाचा मृत्यू तर एकोणीस जण जखमी 

डोंबिवली  ( शंकर जाधव ) : गणेशोत्सवासाठी कोकणातील आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची एसटीतून प्रवास करण्यासाठी प्रचंड गर्दी असते. ठाणे जिल्ह्यातील अनेक उपनगरातून कोकणी  चाकरमानी बांधावासाठी  कोकणात जाण्या साठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून मोफत एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत. शनिवारी सायंकाळी डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे ग्राउंडमधून हजारो प्रवाश्यांना घेऊन जाणाऱ्या शेकडो एसटीत बसेस कोकणाकडे रवाना झाल्या होत्या. डोंबिवलीहून राजापूरला निघालेली एसटी बस( Mho14- bt 2665) ला प्रवाशा दरम्यान माणगाव येथे भरधाव वेगाने समोरून आलेल्या डंपरने धडक दिली धडक दिल्याने  भीषण अपघात झाला.हा अपघात पहाटे साडे चार सुमारास घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या बसमध्ये एकूण ३८ प्रवासी होते.एसटी बसने  डंपरने  जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून अन्य अठरा ते वीस प्रवासी जखमी झाले.विनोद तारले ( ३८ ) असे अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांचे नाव असून यात त्यांची पत्नी वैष्णवी व १५ वर्षीय मुलगा अर्थव हे जखमी झाले.तारले हे डोंबिवली पश्चिमेकडील सरोवर नगर येथील साई गजानन चाळीत राहत होते. विनोद तारले हे व्यवसायाने पेंटर असल्याची माहिती मिळाली आहे.

      या घटनेबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, माणगाव येथे एसटी बसला झालेल्या अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अपघात कशामुळे झाला आणि कोणामुळे झाला याची माहिती घेतली जात आहे.अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले गेले आहे. त्यांना उपचार करून शासनाच्या वाहनातून त्यांच्या घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बस कंटेनरवर आदळल्याने अपघात झाला आहे. दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Tag : # कोकणात जाणार्‍या एसटी बसला अपघात # माणगाव येथे डंपरने दिली धडक # डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या एसटी बसला अपघात # डोंबिवलीहून राजापूर असा प्रवास

Post a Comment

Previous Post Next Post