साकीनाका येथील इमारतीत अग्नी तांडव



मुंबई  :  अंधेरीतील साकीनाका डिसोझा कंपाऊंड, ९० फिट रोड येथील तळ अधिक पाच मजली साकी सोसायटीच्या मीटर बॉक्सला आग लागली. आतापर्यंत ३३ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तसेच अग्नीशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. 

साकीनाका परिसरातील ९० फूट रस्त्यावरील डिसोझा कम्पाऊंडमधील साकी हाऊसिंग सोसायटीतील वीज मीटरला शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास आग लागली. क्षणार्धात आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले. ही आग तळमजला आणि पहिल्या मजल्यावर पसरल्याने इमारतीत रहिवासी अडकले होते. आगीमुळे इमारतीमध्ये धुराचे साम्राज्य पसरले होते. धुरामुळे रहिवाशांना जिन्यावरून खाली येणे शक्य होत नव्हते.

याशिवाय या घटनेत कुणालाही इजा झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नसल्याचे मुंबई अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले आहे. आग लागल्याची घटना समजताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. आगीत कुणालाही इजा झालेली नसली तरी इमारतीतील लाखो रुपयांचे साहित्य भस्मसात झाले आहे.


 

Post a Comment

Previous Post Next Post