महिलेवर अतिप्रसंग करणार्‍या दोघे रिक्षाचालक अटकेत

डोंबिवली ( शंकर जाधव ) :   महिलेवर अतिप्रसंग करण्याच्या  उद्देशाने  जिवे मारण्याचा धाक दाखवून रिक्षामधून अपहरण करून विनयभंग करणाऱ्या दोघा रिक्षाचालकांना मानपाडा पोलिसांनी  अटक केली आहे.या दोघांना गस्त घालणाऱ्या पोलीस शिपाई अतुल भोई व सुधीर हासे यांनी  पाठलाग करून पकडले.

   मिळालेल्या माहितीनुसार,  प्रभाकर भटटु पाटील ( २२ ) ,  व वैभव राजेश तरे, (१९ ) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. वैभव राजेश तरे याच्याविरुद्ध  मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. ८ सप्टेंबर रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला खिडकाळी बस स्टॉपवरुन घरी जाणेसाठी रिक्षात बसली. महिला कोळेगाव नाका येथे उतरत  असताना यातील रिक्षा चालक  प्रभाकर याने  व  पाठीमागे बसलेल्या  वैभव यांनी आपसात संगणमत करुन महिलेला कोळे गाव नाका येथे उतरू दिले नाही. महिलेवर  बलात्कार करण्याचे उददेशाने स्क्रू  ड्रायव्हरने जिवे मारण्याचा धाक दाखवला. दोघांनी रिक्षा निर्जळ स्थळी नेऊन  महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

   सदर वेळी बीटमार्शल  पोशी अतुल भोई  व  सुधीर हासे  रात्रपाळी कर्तव्यावर कर्तव्य करीत असताना त्यांना रिक्षामध्ये दोन इसम एका महिलेला रिक्षात बसून तिच्यासोबत अतिप्रसंग करत तिला निर्जन स्थळी रिक्षाने घेऊन जात असल्याचे संशय आल्याने त्यांनी मोटारसायकलने रिक्षाचा पाठलाग केला. रिक्षा मधील दोघांना कोणीतरी आपला पाठलाग करत आहे असे लक्षात आल्याने त्यांनी सदर महिलेला चालत्या रिक्षातून खाली ढकलून देऊन दिले.त्यावेळी पो.कॉ. अतुल भोई व सुधीर हासे यांनी  जीवाची पर्वा न करता प्रसंगावधान दाखवून रिक्षाचा पाठलाग करून दोघा रिक्षाचालकांना पकडले. रिक्षाचालक वैभवने पोशी अतुल भोई यांच्यावर  स्क्रू  ड्रायव्हरने हल्ला करून जखमी केले.  पोलीस शिपाई भोई व हासे यांच्या कामगिरीबद्दल वरिष्ठांकडून कौतुक   करण्यात आले.




Post a Comment

Previous Post Next Post