ठाण्यात एकनाथ शिंदे मोठा भाऊ तर राज्यात भाजप मोठा भाऊ

एकनाथ शिंदे यांनी भाजपामच्या कार्यकर्त्याना सांभाळून घेण्याची भूमिका ठेवावी - चंद्रशेखर बावनकुळे 

डोंबिवली ( शंकर जाधव ) :  राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्षा आहे. त्यामुळे बरोबर असलेल्या ११ पक्षांना सांभाळणे ही आमची जबाबदारी आहे. तशीच ठाणे जिल्ह्यात कल्याणात शिवसेना एकनाथ शिंदे मोठा भाऊ आहेत. यामुळे त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्याना सांभाळून घेण्याची भूमिका ठेवली पाहिजे. आम्ही देखील राज्यात संभाळून घेण्याची भूमिका ठेवतो असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कल्याणात सांगितले.

    भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये महा विजय २०२४ संकल्प दौरा साठी आले असून दौरा दरम्यान कल्याण पश्चिम विधान सभेतील भाजपाच्या सुपर वारियर्स व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी आधारवाडी येथील गुरुदेव ग्रँड हॉटेल येथे कार्यकर्त्याच्या बैठकीचे उपस्थित होते. या बैठकी दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की महाविजय २४ चे लक्ष गाठण्यासाठी भाजपाचे साडे तीन लाख कार्यकर्ते एका लोकसभेत संपर्कता अभियान राबविणार आहेत. प्रत्येक घरात मोदीनी ९ वर्षात केलेली कामे आणि विश्वकर्मा योजना पोचवणार आहोत. सर्वांना मोदीच पंतप्रधान हवे आहेत. 

भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी भाजपाकडून पोलिस दुजाभाव केला जातो. विकास कामासाठी निधी देताना दुय्यम स्थान मिळत असल्याचा शिवसेना शिंदे गटांवर नाव न घेता आरोप केला होता. यावर बोलताना बावनकुळे यांनी शिंदे यांना बरोबर असलेले सर्व पक्ष महाराष्ट्रात सांभाळत आहेत असे स्पष्ट करतानाच हा आमचा घरचा प्रश्न आहे तो घरात निपटून टाकू, गैरसमज काढून टाकून पुढे जाऊ कारण महावीजय २४ नुसार लोकसभेच्या ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे उदिष्ट ठेवल्याचे ते म्हणाले.

ठाणे लोकसभेची मागणी कार्यकर्ते करत आहेत. कारण प्रत्येक पक्षाला लोकसभेची जागा मिळावी अशी अपेक्षा असते मात्र आम्हाला ४५ प्लस साठी लढायचे आहे. त्यामुळे ज्याला जी जागा मिळेल तिथे भाजपा ५१ टक्क्याची लढाई लढेल. जागा वाटपाचा निर्णय केंद्रीय पार्लमेटरी बोर्डाकडून घेतला जाईल. योग्य प्रकारे जागा वाटप केली जाईल. मोदी तिसऱ्यादा पंतप्रधान पदाची शपथ घेताना महाराष्ट्रातील ४५ खासदारांचे त्याना समर्थन असेल असे काम करण्यासाठी जागवाटप केले जाईल. 

महायुतीच्या एकूण जागांपैकी कल्याण आणि भिवंडी लोकसभेच्या जागा सर्वाधिक मतांनी महायुती जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांना साक्ष ठेवून मराठा आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. १३ कोटी जनतेसह सर्व राजकीय पक्षाचे मराठा आरक्षणाला समर्थन आहे. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्याना आरक्षण द्या अशी आमची मागणी आहे. तर नेत्याना गावबंदी, गाड्या फोडणे, रस्ता रोकणे, गरजेचे नाही. कारण कोणीही विरोधात नाही. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे.

     मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारकडे आहे, त्याचा केंद्र सरकारचा संबद्ध आलेला नाही यामुळेच यावर मोदी काय वक्तव्य करणार. सर्वोच्च न्यायालयाने सुचविलेल्या बाबी प्रमाणे राज्य सरकराला कारवाई करावी लागेल. त्यानंतर केंद्र सरकरचा रोल येईल उगीच मोदीना बदनाम करू नये असा इशारा दिला.

   नारायण राणे यांच्या फेक कॉलवर बोलताना त्यांनी राणे इतके छोटे नेते नाहीत. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम त्यांच्याच समंतीने झाले होते. यामुळे त्यांनी वक्तव्य केल्याचे भासवले जात आहे ते पुन्हा एकदा तपासून घेतले पाहिजे असेही सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post