सकल मराठा समाजाकडून बावनकुळेंना काळे झेंडे

डोंबिवली ( शंकर जाधव): भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविजय २०२४ संकल्प दौरा दरम्यान कल्याण लोकमान्य टिळक चौकामध्ये आयोजित संपर्क से समर्थन अभियानाच्या समारोपाच्या चौक सभेचे आयोजन केले होते. चौक सभा सुरू असतानाच कल्याणमधील सकल मराठा समाजाच्या काही तरुणांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांना काळे झेंडे दाखवून एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे बावनकुळे गो बॅक च्याच घोषणा देत त्यांचा निषेध केला. यावेळी तणावाचे वातावरण पाहताच पोलिसांनी मध्यस्थी करत लगेचच सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने वातावरण तप्त झाले होते.



Post a Comment

Previous Post Next Post