मानपाडा पोलिसांची कामगिरी
डोंबिवली ( शंकर जाधव ) : शहरातील वाढत्या सोनसाखळी चोरी व मोटरसायकल चोरीच्या तक्रारी वाढ झाली आहे. पोलिसांनी चोरट्यांना शोध घेत दोघांना बेड्या ठोकून गजाआड केले.अटक केलेल्या चोरट्यांकडून पोलिसांनी ८ लाख ६८ हजार पाचशे रूपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात करण्यात आला.iमानपाडा पोलिसांच्या या कामगिरीचे वरिष्ठांकडून कौतुक होत आहे.
पोलिसंकडून मिळालेल्या माहितीनुसार, वारिस मिराज खान (२४) आणि मोहम्मद जाफर कुरेशी ( ३०) असे अटक केलेल्या सोनसाखळी चोरट्याचे नाव आहे.मानपाडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवि सोन्या गवळी हे मॉर्निंग वॉक करत डी मार्ट समोरील रोडने जात असताना मोटार सायकलवरून जात असलेल्या दोन अनोळखी इसमांनी गवळी यांच्या गळयातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने खेचुन त्यांना धक्का देऊन धूम ठोकली. गवळी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मानपाडा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सोनसाखळी चोरटे नवी मुबंई तळोजा मार्गे डोबिंवलीकडे येत असल्याचे समजल्यावर पोलीसांनी निसर्ग हॉटेल समोरील रोडवर साध्या वेशात तीन ठिकाणी सापळा लावला. तळोजा रोडकडुन आरोपीची मोटार सायकल निसर्ग हॉटेल जवळ येताच पोलीसांनी त्यांना जाळ्यात अटकवण्यासाठी रस्त्याने येणारी जाणारी वाहने रोडवर थांबवली. याचा चोरट्यांना संशय आल्याने मोटार सायकल रोडवर टाकून पळुन जाण्याचा प्रयत्न केला.मात्र पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग करून पकडले.
अटक आरोपी वारिस मिराज खान हा अटाळी आंबिवली, कल्याण तर मोहम्मद जाफर कुरेशी हा शहाड, कल्याण पूर्व येथे राहतात. चोरट्यांनी कल्याण, कोळसेवाडी व डोबिंवली परिसरात चैन स्नॅचिंगचे एकुण ८ गुन्हे व मोटार सायकल चोरीचा १ गुन्हा केल्याची पोलीसांकडे कबुली दिली आहे. या दोन्ही चोरट्यांकडून सर्व गुन्हयामध्ये ८,१८,५००/- रूपये किंमतीचे १५१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ५०,०००/- हजार रूपये किंमतीची चोरीची बजाज पल्सर मोटार सायकल असा एकुण ८,६८,५००/- रूपये किंमतीचा मुददेमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे मानपाडा पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या देखरेखीखाली पोनि (प्रशा )सुरेश मदने,
पोनि (गुन्हे) राम चोपडे, पोनि दत्तात्रय गुंड, सपोनि अविनाश वनवे, सुनिल तारमळे, सपोउपनिरी भानुदास काटकर, पोहेकॉ संजु मासाळ, शिरीष पाटील, सुनिल पवार, विकास माळी, राजेंद्र खिलारे, दिपक गडगे, पोना शांताराम कसबे, पोना यल्लप्पा पाटील, महादेव पवार, पोकॉ विजय आव्हाड, महेंद्र मंझा, विनोद ढाकणे, अशोक अहेर, पोना महाजन, पोकॉ चंद्रकांत खरात, पोना पाटील, पोकॉ संदीप खरात यांचे पथकाने केली आहे.