नवी दिल्ली : डार्क वेबच्या माध्यमातून ८१.५ दशलक्ष भारतीय वापरकर्त्यांचा संवेदनशील वैयक्तिक डेटा लीक झाल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) कोविड-१९ चाचणी दरम्यान गोळा केलेल्या माहितीवरून समोर आले आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) COVID-१९ चाचणी दरम्यान गोळा केलेल्या डेटावरून ही माहिती समोर आली आहे. तथापि, ही माहीती लीक कुठून झाली हे अद्याप कळू शकलेले नाही. 'pwn0001' -- एका हॅकरने -- चोरलेल्या माहितीची जाहिरात डार्क वेबवर केल्याने डेटा लीक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) लीकचा तपास करत आहे. हॅकरने शेअर केलेल्या डेटानुसार, चोरलेल्या माहितीमध्ये लाखो भारतीयांची नावे, फोन नंबर आणि तात्पुरते आणि कायमचे पत्ते यासह आधार आणि पासपोर्ट तपशीलांचा समावेश आहे. हा डेटा आयसीएमआरने COVID-१९ चाचणी दरम्यान गोळा केलेल्या माहितीवरून आल्याचा दावाही हॅकरने केला आहे. ८१.५ कोटी भारतीयांची संवेदनशील माहिती समोर आली आहे, जी भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी डेटा लीक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
डेटा लीक झाल्याची माहिती सर्वात प्रथम रेसिक्युरिटी या अमेरिकन एजन्सीने सायबर सिक्युरिटी आणि इंटेलिजेंसमध्ये दिली होती. ९ ऑक्टोबर रोजी, 'pwn0001' ने ब्रीच फोरम्स या वेब साईटवर लीक झालेला डेटाचा तपशील उघड केला, यामध्ये "भारतीय नागरिक आधार आणि पासपोर्ट" डेटासह ८१५ दशलक्ष रेकॉर्डच्या उपलब्धतेची जाहिरात केली होती.
सुरक्षा संशोधकांनी शोधून काढले आहे की लीक झालेल्या डेटामध्ये भारतीय नागरिकांच्या वैयक्तिक तपशीलांसह १००,०००.फायली होत्या. त्यांची अचूकता तपासण्यासाठी, यापैकी काही नोंदी सरकारी पोर्टलच्या "आधार सत्यापित करा" वैशिष्ट्याचा वापर करून पुष्टी केल्या गेल्याने आधार माहिती खरी असल्याचे प्रमाणित केली गेली.
न्यूज १८ च्या वृत्तानुसार, कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया (CERT-In) ने देखील आयसीएमआरला उल्लंघनाबद्दल अलर्ट केले आहे. कोविड-१९ चाचणीची माहिती नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC), ICMR आणि आरोग्य मंत्रालय यांसारख्या विविध सरकारी संस्थांमध्ये विखुरलेली आहे, ज्यामुळे हा डेेटा लीक कुठन झाला हे शोधणे आव्हानात्मक असल्याचे म्हटले जात आहे.
भारतातील एखाद्या मोठ्या वैद्यकीय संस्थेला डेटा लीक करणाऱ्या चोरांशी सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला, सायबर गुन्हेगारांनी AIIMS चे सर्व्हर हॅक केले आणि मोठ्या खंडणीची मागणी करत संस्थेतील १ TB पेक्षा जास्त डेटा ताब्यात घेतला होता. डिसेंबर २०२२ मध्ये, एम्स दिल्लीचा डेटा चिनी लोकांनी हॅक केला होता आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये २०० कोटीची मागणी केली होती.