चोरटे अटकेत
डोंबिवली ( शंकर जाधव ) : एका नागरिकाला मारहाण करून त्याच्याकडून महागडी चैन आणि दहा हजार रुपये रोख रक्कम ठेवलेली त्याची पर्स घेऊन चोरटे मोटरसायकलीवरून धूम स्टाईलने पसार झाले.कल्याण पश्चिमेकडे घडलेल्या घटनेत या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघा चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकून गजाआड केले.
ही घटना सीसीटीव्हीत कैद होती.या दोघांना नशेची सवय आहे. नशा करण्यासाठी पैसे नसल्याने या दोघांनी चौरीचा मार्ग पत्करला होता. मिळालेल्या माहितीनुसार, निहाल शेख आणि चांद शेख असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरिक्षक अशोक कडलक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अजिंक्य मोरे तपास करीत होते. अटक केलेल्या चोरट्यांकडून दागिने आणि रोख रक्कम हस्तगत केली आहे. या दोेघांनी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकली चोरी केली होती. या मोटारसायकली देखील पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.यातील अटक केलेला चोरटा निहाल हा रिक्षाचालक आहे. तर चांद हा बेरोजगार आहेत.
