दिवाळीनिमित्त नागरिकांना शिवसेना विभागप्रमुख अमोल पाटील यांच्यावतीने भेटवस्तू

 

 

डोंबिवली ( शंकर जाधव ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशानुसार उपजिल्हाप्रमुख राजेश कदम आणि डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख अमोल पाटील आणि लीना पाटील यांच्यावतीने दिवाळीला गोग्रासवाडीतील नागरिकांना स्वदेशी लाईटिंगच्या पणत्या देण्यात आल्या.

तसेच गोग्रासवाडीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिवाळी भेट वस्तू देण्यात आल्या. यावेळी उपविभागप्रमुख एकनाथ गायकवाड, महिला उपविभागप्रमुख नांदणी पोळ, शाखाप्रमुख स्वप्नील सोमजी, महिला शाखा संघटक मोहिनी जाधव, युवा शाखा अधिकारी प्रफुल तावडे, उपशाखाप्रमुख शैलेंद्र सिंग,महिला उपशाखासंघटक शुभांगी तांबे, श्रुती गुप्ता, गटप्रमुख परशुराम गुप्ता, दशरथ गुप्ता, रेखा शेट्टी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अमोल पाटील म्हणाले, शिवसेना ही नेहमी जनसामान्य बरोबर असते.




Post a Comment

Previous Post Next Post