डोंबिवलीत किलबिल फेस्टिव्हलमध्ये बच्चेकंपनीची फुल धम्माल

`आमच्या पप्पांनी गणपती आणला`फेम बालकांचा सहभाग 

  डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकेल्पनेतुन अनेक वर्षापासून डोंबिवलीत 'किलबिल फेस्टिव्हल' भरविले जाते.यावर्षी डोंबिवली पश्चिमेकडील बावनचाळ जवळील रेल्वे मैदान येथे किलबिल फेस्टिव्हलमध्ये बच्चेकंपनीची फुल धम्माल केली. यंदा ' आमच्या पप्पांनी गणपती आणला' फेम बालकांचा सहभाग घेतला होता.

 किलबिल फेस्टिव्हलमध्ये 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' फेम मोहित आणि शौर्य या भाऊ-बहिनीने महोत्सवात गाणी गात या बालमहोत्सवात रंगत आणली. फेस्टिव्हलमध्ये धम्माल करण्यासाठी पालक आपल्या पाल्यांना घेऊन आले होते.  फेस्टिव्हल मध्ये कमांडो ब्रिज, रिव्हर क्राॅसिंग, वाॅल क्लायमिंब, सेगवे व्हेईकल्स ,  ट्रम्पोलाईन, राॅक हॅमर, जम्पिंग सारख्या खेळांचा आनंद चिमुकल्यानी घेतला.त्याच प्रमाणे  चित्रकला, ड्रामा, जादूचे प्रयोग, जगलरचे प्रयोग ,अल्लाउद्दिनचा जीन, रोली पोली, मिकी माऊस, मिनी, जायंट टेडी बेअर, जायंट पांडा, जोकर यांनी छोट्या बालगोपाळांबरोबर धम्माल मौज मजा केली. हवेत नृत्यकला सादर करणारी शुटिंग स्टार,  स्टिक वाॅकर आणि मिरर मॅन हे फेस्टिव्हलचे आकर्षण ठरले.



Post a Comment

Previous Post Next Post