डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या एका बोगीला अचानक आग लागल्याची घटना रविवारी घडली. याची माहिती मिळताच अग्निशमन विभाग व रेल्वे कर्मचाऱ्यांचे पथक घटना स्थळी दाखल झाले. शर्तीचे प्रयत्न करूनआगे वरती नियंत्रण आणण्यासाठी युद्धपातळीवर शर्तीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत बोगी पूर्णपणे जळून खाक झाली. आगीमुळे पूर्ण परिसरात धुराचे लोट पाहून परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी आग गर्दुल्ल्यामुळे लागली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.
Tags
महाराष्ट्र
