मुंबई महानगर पालिका ॲक्शन मोडवर
मुंबई: दुकाने आणि अस्थापणांनी मराठीत फलक लावावे यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. ती उलटून गेल्यावर मुंबई पालिकेकडून २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली. मात्र मुंबई पालिकेने दिलेली मुदतवाढ देखील संपुष्टात आली असल्याने पालिकेन आता आक्रमक पावले उचलत थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी ४८ पथक २४ वॉर्डमध्ये फिरणार असून ज्यांनी मराठी फलक लावले नाही, त्यांच्यावर प्रती कामगार २ हजार रुपये दंड तसेच कायदेशीर कारवाई देखील केली जाणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ज्या दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या नाहीत त्यांच्यावर आज मंगळवार पासून (दि २८) थेट कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई पालिकेने ज्यांनी यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल ४८ पथक २४ वॉर्डमध्ये गस्त घालणार आहेत.
मुंबईत मराठी पाट्या असाव्या असा निर्णय मुंबई महागरपालिकेने घेतला होता. ज्या दुकानात जास्त कामगार असतील त्या दुकानात मराठी पाट्या लावणे अनिवार्य केले होते. दरम्यान, काही दुकानदारांनी मराठीत फलक लावले होते. तर काही दुकानदारांनी याला विरोध केला होता. तसेच या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने मुंबई पालिकेच्या बाजूने निर्णय देऊन मराठी पाट्या लावण्यासाठी २५ नोव्हेंबर ही मुदत दिली होती. तसेच दुकांनाना गड किल्ले, महान व्यक्तींची नावे देण्यात येऊ नये असा देखील नियम करण्यात आला होता.
