देशातील ८० कोटी जनता ऐतखाऊ

 रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचे वक्तव्य 

मुंबई: देशातील ८० कोटी जनता ऐतखाऊ आहे, त्यामुळे भारतातील रेशन व्यवस्था कायमची बंद करून देशाला बलशाली करा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सोयाबीन, कापसाला चांगला दर मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यातील चिखलीत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे त्यावेळी रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सदाभाऊ खोत बुलढाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.रविकांत तुपकर यांनी ८ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयाचा ताबा घेणार असल्याचा इशारा दिला आहे.

 राज्यासह देशातील कोट्यवधी कुटुंबांना रेशनिंग व्यवस्थेचा मोठा आधार आहे. अनेक अर्थतज्ज्ञांकडून सार्वजनिक वितरण प्रणाली मजबूत करण्याची मागणी केली जात असताना भाजप महायुतीमधील सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सदाभाऊ खोत यांनी थेट भाजपच्या प्रमुख मुद्याला विरोध कसा केला, याची चर्चा सुरू झाली आहे. 

सदाभाऊ खोत म्हणाले की, राज्यात ४० टक्के समाज शेतीवर आहे. तर, ८० कोटी लोक ऐत खात आहेत. यामुळे देशातील रेशन व्यवस्था बंद करण्यात यावी, ज्यामुळे आपला देश बलशाली होईल, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. इतकी माणसे आयत खात असतील तर हा देश भिकाऱ्यांचा आहे. देशातील लोकांना भिकारी बनवण्याचे काम सुरु आहे, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी टीकास्त्र सोडले आहे.

राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. हे फुकट ते फुकट, त्यामुळे देश भिकाऱ्यांचा बनत चालला आहे. माणसाला ज्यावेळेस सगळे फुकट मिळते, तेव्हा समजा त्या सगळ्या अफूच्या गोळ्या आहेत. प्रत्येकाने श्रम करावे, श्रमावरच देश बलशाली होईल, असे मत सदाभाऊ यांनी मांडले. माणसाला ज्यावेळेस सगळं फुकट मिळतं समजा त्या सगळ्या अफूच्या गोळ्या आहेत. राजकीय पक्षांची चढाओढ लागली आहे हे फुकट ते फुकट त्यामुळे देश भिकाऱ्यांचा बनत चालला आहे. प्रत्येकाने श्रम करावे श्रमावरच देश बलशाली होईल असेही सदाभाऊ खोत म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post