डोंबिवली ( शंकर जाधव ) : पालिकेच्या एका कर्मचाऱ्यावर भररस्त्यात हल्लेखोरांनी चाकूने वार करून पसार झाले. ही घटना सोमवारी रात्री साड़े आठ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली विभागीय कार्यालयाजवळ घडली.
हल्लेखोराला नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला मात्र हल्लेखोरांनी चाकू त्याच ठिकाणी टाकून पसार झाले.विनोद लकेश्री असे हल्ल्यात जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.हा हल्ला कोणी केला ? हल्ल्यामागे कोणाचा हात होता ? याचा शोध पोलीस करत आहेत.
Tags
महाराष्ट्र गुन्हे