फेरीवाल्यांना लोकलमध्ये माल विकण्यास बंदी असावी

 


  • मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी
  • मध्य रेल्वे व्यवस्थापकांकडे पत्र



डोंबिवली ( शंकर जाधव ) : आधीच रेल्वेने प्रवास करत असताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्यातच फेरीवाल्यांना परवानगी दिल्यास प्रवाशांना  मनस्ताप सहन करावा लागणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने फेरीवाल्यांना लोकलमध्ये माल विकण्यास दिलेल्या परवानगीचा निर्णय मागे घ्यावा अशा मागणीचे पत्र  मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी मध्य रेल्वे व्यवस्थापकांकडे पत्र दिले आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या हि दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वेत प्रवासादरम्यान प्रवेश करण्यापासून उतरण्यापर्यत मोठा संघर्ष करावा लागत आहे.त्यातच अनधिकृत फेरीवाल्यांना प्रवेश दिल्यास प्रवाश्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. सद्य परिस्थितीत अनधिकृत फेरीवाल्यांच्या तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे वाढत आहेत. मात्र प्रवाशांच्या तक्रारींकडे रेल्वे प्रशासनाकडून  दुर्लक्ष केले जात आहे.त्यामुळे रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत असताना आता फेरीवाल्यांचा मोठा मनस्ताप होत असतो.त्यामुळे रेल्वे प्रशासनाने फेरीवाल्यांना लोकलमध्ये माल विकण्यास दिलेल्या परवानगीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे केली आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता लोकल वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता होण्याआधीच रेल्वेत अनधिकृत फेरीवाल्यांना प्रवेश देऊन रेल्वे प्रवाशांना मनस्ताप देण्याच्या विचारात आहे. त्यामुळे रेल्वेने घेतलेल्या निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post