दिवा, (आरती मुळीक परब) : दिव्यात मुंब्रा देवी कॉलनी आणि साबे गावातील काही भागात मनसेच्या वतीने एक कोटी १५ लाखाच्या निधीतून गटार, नाल्यांच्या कामांचे आज भूमिपूजन करण्यात आले.
दिव्या मधील मुंब्रा देवी कॉलनीतील साई अमृत सोसायटी ते साई लिला सोसायटी पर्यंतच्या रस्त्याचे आणि साई अमृत सोसायटी ते अथर्व प्लाझा पर्यंतचे भूमीगत गटाराच्या कामाचे आज जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर आणि दिवा मनसे शहराध्यक्ष तुषार पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून भूमीपूजन करण्यात आले.
ह्या दोन्हीं कामांसाठी ७५ लाखांचा निधी मनसे कडून मंजूर झाला आहे. तसेच भास्कर स्मृती ते होली स्पिरिट शाळे पर्यंतच्या भूमिगत गटाराच्या, रस्त्याच्या आणि पायवाटांच्या कामासाठी ही मनसेकडून ३५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. हे दोन्ही निधी ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांच्या निधीतून एकूण एक कोटी १५ लाख मंजूर झाल्याने त्याचे आज भूमीपूजन मनसेतर्फे केले गेले. आज त्याचे ही भूमीपूजन तुषार पाटील आणि मनसे पदाधिकारी यांच्या हस्ते झाले.
त्यावेळी कल्याण ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, दिवा मनसे शहराध्यक्ष तुषार पाटील, शहर सचिव प्रशांत गावडे, विभाग अध्यक्ष देवेंद्र भगत, विभाग सचिव परेश पाटील, मनविसे शहर अध्यक्ष कुशाल पाटील, भानुदास पाटील, शीळ अध्यक्ष शरद पाटील, प्रकाश पाटील तसेच सर्व शाखाध्यक्ष, निकिता सालप, अंकीता कदम, नम्रता खराडे, महिला पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.