डोंबिवलीतील माउली तलावाचे रूप पालटणार

- तलाव पुनुरुज्जीवन आणि सुशोभीकरणासाठी निविदा जाहीर

डोंबिवली ( शंकर जाधव ) :    डोंबिवली शहरातील पूर्व भागातील निळजे गावात लोढा पलावा टाऊनशिपच्या परिसरात माऊली तलाव आहे. या तलावाची निगा राखली न गेल्याने तलावाची दुरवस्था झाली आहे. या तलावाचे पुनुरुज्जीवन आणि सुशोभीकरणासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे गेल्या अनेक महिन्यापासून प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तलाव पुनुरुज्जीवन आणि सुशोभीकरणासाठी १४ कोटी ९२ लाख रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे. एक वर्षाच्या कालावधीत हे काम होणे अपेक्षित असून या अंतर्गत तलाव क्षेत्रात विविध वास्तूंची उभारणी करण्यात येणार असून तलावातील गाळ काढून स्वच्छ करण्यात येणार आहे.

डोंबिवली शहरातील पूर्व भागातील माऊली तलाव अत्यंत जुना आणि ऐतिहासिक दृष्टया महत्वाचा जलस्रोत आहे. तसेच माऊली तलाव त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी, झाडे आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासासाठी ओळखला जातो. या ठिकाणी पाणपक्षी जसे की टील्स, ब्राह्मणी बदक, तितर, शेपटी जॅकनस, मूर्हेन्स यासारखे अनेक स्थलांतरित पक्षी तलावाच्या परिसरात हिवाळ्याच्या कालावधीत सातत्याने दिसून येतात. या पक्षांना पाहण्यासाठी तसेच तलाव परिसरात फेरफटका करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. यामुळे या ठिकाणी नागरिकांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देणे महत्वाचे होते. यामुळे तलाव परिसराचे सुशोभीकरण व्हावे यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्नशील होते. याबाबत कल्याणडोंबिवली महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी याबाबाबत त्यांनी पाठपुरावा केला होता. याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तलाव पुनुरुज्जीवन आणि सुशोभीकरणासाठी १४ कोटी ९२ लाख रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे. निविदा प्रक्रियेचे काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. एक वर्षाच्या कालावधीत हे काम होणे अपेक्षित आहे. या अंतर्गत तलाव परिसरात विविध वास्तूंची उभारणी करण्यात येणार असून सद्यस्थितीत असलेल्या मात्र दुरावस्था झालेल्या वास्तूंची डागडुजी करण्यात येणार आहे

असे होणार तलावाचे सुशोभीकरण

माउली तलावाचे क्षेत्रफळ ५.५९ हेक्टर इतके असून तलावातील पाण्याचे अंदाजित क्षेत्रफळ ४.४ हेक्टर इतके आहे. तलाव सुशोभीकरण प्रकल्पामध्ये विविध वास्तूंची नव्याने उभारणी करण्यात येणार आहे.

या अंतर्गत

  • भव्य प्रवेशद्वार
  • वास्तुशिल्प, शब्द शिल्प
  • ओपन जिम आणि योगा करण्यासाठी जागा
  • मंदिर, उद्यान
  • मुलांना खेळण्यासाठी उद्यान
  • पक्षी पाहण्यासाठी टॉवर
  • कारंजे आणि लाइटनिंग प्रोजेक्शन
  • झेंडा फडकावण्यासाठी विशेष जागा
  • विशेष फुलांचे उद्यान


Post a Comment

Previous Post Next Post