डोंबिवलीतील नांदीवली टेकडीजवळील घटना
डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीमधील नांदिवली टेकडी परिसरात डॉ. सदानंद सिहं हे राहत असून रविवारी संध्याकाळच्या सुमारास डॉ .सदानंद हे आपल्या क्लिनिकमध्ये गेले होते. या संधीचा फायदा घेत तोंडाला रूमाल बांधलेले दोन चोरटे घरात शिरून त्यांनी 8 वर्षीय मुलीचे हात बांधून आणि तोंडात कापडाचा बोळा कोंबून बेडरूममधील कपाटात ठेवलेली ४०,०००/- रोख रक्कम आणि देवघराच्या ड्राव्हरमधील डब्यात ठेवलेले सोन्याचे मंगळसुत्र असे एक लाख ९० हजाराचा मुद्देमाल चोरी करून पसार झाले.
याप्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चोरटे इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले होते.
Tags
महाराष्ट्र गुन्हे
