२०२४ ला मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे


  रविंद्र चव्हाण ( ravindra chavan)  यांचे प्रतिपादन 

डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पश्चिम मंडळ सचिव डॉ. सर्वेश सावंत यांच्या डोंबिवली पश्चिमेकडील कैलास नगर येथील न्यू प्लोरा सोसायटीमधील भाजप (bjp) जनसंपर्क कार्यालयाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी प्रज्ञेश प्रभूघाटे, डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष समीर चिटणीस, दिनेश जाधव, माजी नगरसेवक मुकुंद ( विशू ) पेंढणेकर, डॉ. सर्वेश सावंत, त्यांची आई सीमा सावंत, प्रशांत पाटेकर यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 डोंबिवलीकरांनी भाजपवर विश्वास ठेवल्याबद्दल आभारी आहे. आपल्या पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान म्हणून पहायचे आहे. एकूण घेण्यासाठी कार्यालयाच्या माध्यमातून सकपाळ पर्यत पोहोचतील. त्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबंध आहे. येथील नागरिकांचा रविंद्र चव्हाण यांच्यावर विश्वास आहे. महाविजय २०२४ ला मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी देशभरात संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा मतदार संघात जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून  जास्तीत जास्त लोकांना एकत्र आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रभागात कार्यालय सुरु होत आहे.

 प्रत्यक्षात या कार्यालयात सर्व विषयांवर चर्चा करणे आणि मतदारांना देण्यात येणारा विश्वास हे मध्यम असणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post