डोंबिवली ( शंकर जाधव ) : बारा बलुतेदारांच्या व्यवसायांना नवसंजीवनी देणारी योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना असल्याचे मत विश्वकर्मा योजना कोकण विभाग प्रमुख नरेंद्र पवार यांनी केले. ते कोकण विभागाच्या विश्वकर्मा योजनेच्या बैठकीत रत्नागिरी येथे बोलत होते.
यावेळी विश्वकर्मा योजना कोकण विभाग प्रमुख नरेंद्र पवार यांनी CSC सेंटरवर नोंदणी कसी करावी व योजने विषयी विस्तृत माहिती दिली. ही योजना बारा बलुतेदार समाजातील पारंपारिक कारागिरांना सन्मान, सामर्थ्य व समृध्दी देणारी योजना आहे.विश्वकर्मा प्रमाणपत्र,प्रशिक्षण, टुल किट , पहिला टप्पा एक लाख ,दुसरा टप्पा दोन लाख कर्ज ५%टक्के दराने मिळणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. समाजामध्ये पारंपरिक व्यवसाय गेली अनेक वर्षे सुरू आहेत. समाज व्यवस्था ही बारा बलुतेदार यांच्या व्यवसायावर सुरू होती त्या व्यवसायांना आर्थिक स्थैर्य देऊन पुन्हा एकदा बळकट करण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आणली आहे. गावगाड्यातल्या अगदी सामन्यातल्या सामान्य व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, पंतप्रधान मोदीजी एवढा सूक्ष्म विचार करुन योजना आणतात तर आपण त्या तळागाळापर्यंत पोहचविल्या पाहिजे असे मत विश्वकर्मा योजना कोकण विभाग प्रमुख नरेंद्र पवार यांनी केले. तसेच प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि नरेंद्र गावकर यांचे मार्गदर्शन झाले. आणि बैठकीचा समारोप माजी आमदार सुरेंद्रनाथ ( बाळ) माने यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, रत्नागिरी विधानसभा क्षेत्र प्रमुख माजी आमदार बाळासाहेब माने, ओबीसी जिल्हाध्यक्ष अभिजित शेट्ये, संगमेश्वर विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रमोद अधटराव, विश्वकर्मा रत्नागिरी जिल्हा समिती अध्यक्ष अशोक मयेकर, विश्वकर्मा मुंबई संयोजक नरेंद्र गावकर साहेब, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
