अमराठी पाट्याविरोधात डोंबिवलीत मनसे आक्रमक

Maharashtra WebNews
0

 


 पोलीस व पालिका प्रशासनाला निवेदन 

डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने मराठी पाट्या लावण्यावर आग्रही भूमिका घेत असते. पालिका प्रशासन तसेच सहाय्यक कामगार आयुक्त याकडे दुर्लक्ष करीत आहेत. न्यायालयानेही सरकारवर या विषयी ताशेरे मारले आहेत. परंतु याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. अखेर शुक्रवारी डोंबिवलीत मनसे पदाधिकारी व मनसैनिकांनी पालिका आणि पोलीस प्रशासन अधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाई करा नाहीतर आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा दिला.

 मनसे डोंबिवली शहराच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त व कल्याण डोंबिवली महानगरपालिका उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, विष्णूनगर, रामनगर, टिळकनगर आणि मानपाडा पोलिस ठाणे आदी कार्यालयात जाऊन त्यांना कोर्टाच्या आदेशानुसार काम करण्याची व मराठी भाषेत नसलेल्या आस्थापनांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी शासन नियमानुसार कारवाई करत असल्याचे महानगर पालिका उपायुक्तांनी सांगितले. परंतु सहाय्यक कामगार आयुक्तांनी याविषयी कारवाई करण्यास असमर्थता दर्शवली. दरम्यान कारवाई केली नाही तर आम्ही तुम्हाला तुमच्या कार्यालयात बसु देणार नाही, तुम्हाला इथे बसण्याचा अधिकारच नाही असे कडक शब्दात डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत यांनी सांगितले. यावेळी डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत, कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव अरुण जांभळे, डोंबिवली विधानसभा सचिव उदय वेळासकर, शहर सचिव संदीप (रमा) म्हात्रे, विद्यार्थी सेना जिल्हा सचिव प्रितेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.





Post a Comment

0Comments

Post a Comment (0)