- प्रत्येक सेकंदाला २.५ बिर्याणीची ऑर्डर
- स्वीटमध्ये गलाबजामून फेव्हरेट
घर की मुर्गी दाल म्हणतात, ना तास काहीसा प्रकार भारतातील घरोघरी घडत आहे. कारण घरच्या जेवणाला नकार देत अनेक भारतीय ऑनलाईन पदार्थ मागविण्यावर अधिक पसंती देत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. विशेषतः या ऑनलाईन खाद्यपदार्थांमध्ये बिर्याणी आणि गुलाबजामुनने बाजी मारली आहे. होय हे खरे आहे. सलग आठव्या वर्षी स्विगीवर सर्वाधिक ऑर्डर केलेल्या डिशमध्ये बिर्याणी अग्रस्थानी आहे.
स्विगीने आपल्या वार्षिक अहवाल होऊ इंडिया स्विगड २०२३ मध्ये आपल्या ऑर्डर व्हॉल्यूमबद्दल काही खुलासे केले आहेत. यामध्ये यंदाही बिर्याणी आघाडीवर राहिली हे. या वर्षी स्विगीवर सर्वात जास्त बिर्याणीची ऑर्डर करण्यात आली आहे.यावर्षी, लोकांनी स्विगीतून दिवसाला २०७ पिझ्झा ऑर्डर करण्यापासून ते व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दर मिनिटाला २७१ केक ऑर्डर केल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ऑर्डरबद्दल सांगणार आहोत, ज्याने २०२३ मध्ये सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका ग्राहकाने वर्षभरात स्वीगीकडून ४२.३ लाख किमतीची फूड ऑर्डर केली होती. यातील बहुतांश ऑर्डर चेन्नई, दिल्ली आणि हैदराबादच्या युजर खात्यांमधून होत्या. त्या प्रत्येकाने १०,००० पेक्षा जास्त ऑर्डर दिली आहे. यावर्षी झाशीतून २६९ वस्तू मागवण्यात आल्या होत्या. तर भुवनेश्वरमध्ये एकाच दिवसात २०७ पिझ्झाची ऑर्डर देण्यात आली होती.
२०२३ मध्ये भारतातून प्रत्येक सेकंदाला २.५ बिर्याणी ऑर्डर करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्येक ५.५ चिकन बिर्याणीसाठी एक व्हेज बिर्याणी ऑर्डर केली जात आहे. चंदीगडमधील एका कुटुंबाने एकाच वेळी ७० प्लेट बिर्याणीची ऑर्डर दिली होती. ऑक्टोबरमध्ये पाकिस्तान विश्वचषक सामन्यादरम्यान, स्विगीला दर मिनिटाला २५० पेक्षा जास्त बिर्याणीच्या ऑर्डर मिळत होत्या.
२०२३ या वर्षाचा शेवटचा महिना संपत आला आहे. गेल्या काही वर्षांत ऑनलाईन खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यााच्या ट्रेंडमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यावर्षीही लोकांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खाद्यपदार्थ ऑर्डर करण्याला प्राधान्य दिले आहे. विश्वचषक असो, दिवाळी असो किंवा होळी ऑनलाईन खाद्यपदार्थ वितरणाची मागणी यंदा खूप वाढली आहे.
मिठाईत गुलाबजामुनची आघाडी
अहवालानुसार, या वर्षी दुर्गा पूजेदरम्यान, गुलाब जामुनने ७.७ दशलक्षाहून अधिक ऑर्डर्ससह इतर सर्व मिठाईंना मागे टाकले. गरब्यासोबतच नवरात्रीच्या सर्व नऊ दिवसांच्या शाकाहारी ऑर्डरमध्ये मसाला डोसा अव्वल आहे. हैदराबादमधील एका ग्राहकाने इडलीसाठी ६ लाख रुपये खर्च केले. प्रत्येकाच्या आवडत्या चॉकलेट केकसाठी ८.५ दशलक्ष ऑर्डर्स दिल्या आहेत. व्हॅलेंटाईन डे २०२३ दरम्यान, देशात दर मिनिटाला २७१ केक मागवण्यात आले. नागपुरातील एका ग्राहकाने एकाच दिवसात ९२ केक मागवले.

.jpeg)
