डोंबिवली ( शंकर जाधव ) : ज्वेलर्सच्या दुकानात भिंतीला भगदाड पडून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो असफल झाल्याने चोरट्यांनी ज्वेलर्समधील चांदी आणि सोन्याचे दागिने असा एकूण ७६ लाखाचा ऐवज चोरून पसार झाला. एवढेच नव्हे तर आपला चेहरा सीसीटीव्ही कॅमेरात कैद होऊ नये म्हणून चोरट्यांनी ज्वेलर्समधील सीसीटीव्ही कॅमेरातील डिव्हीआर ही चोरले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , डोंबिवली पश्चिमेला महात्मा फुले रोडवर रत्नसागर ज्वेलर्सचे दुकान आहे.चोरट्यांनी ज्वेलर्सचे दुकानात चोरण्यासाठी शक्कल लढवत बाजूकडील गाळा भाड्याने घेतला होता.चोरटे हे झारखंड येथील राहणारे होते. त्यांनी मोमोज तयार करण्याचा बोर्ड लावला होता.२८ तारखेला रात्री चोरट्यांनी गाळ्यात जाऊन शटर बंद करून बाजूकडील ज्वेलर्सच्या दुकानाची भिंतीला भगदाड पडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी गॅस कटरने तिजोरी कट करण्याचा प्रयत्न केला असता असफल झाले. चोरट्यांनी ज्वेलर्समधील चोरट्याने ११० किलो चांदी आणि काही प्रमाणात सोन्याचे दागिने चोरून पसार झाले.