स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ( दत्तनगर )प्राथमिक शाळेत संगणक प्रकल्पांचे प्रदर्शन

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) :  स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक शाळेत शनिवारी  इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे संगणक प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनास रजत कॉम्प्युटरचे संस्थापक राजेश चासकर, शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली मुणगेकर उपस्थित होत्या. सदर प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून संगणक प्रकल्प  अनावरण करण्यात आले.पाहुण्यांनी प्रकल्पाचे निरीक्षण केले. 

विद्यार्थ्यांनी वेगळ्या प्रकारे आपल्या कल्पनेनुसार सुंदर प्रतिकृती व तक्ते बनवलेले होते. प्रकल्पात संगणकीय संकल्पना, त्यांचे प्रकार, उपयोग हे आपल्या प्रतिकृतीतून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला .यात संगणक शिक्षिका व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक यांचे सहकार्य लाभले .सदर प्रदर्शनाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना संगणकाबद्दल असलेली जिज्ञासा वाढीस नेण्याचा हेतू सफल झाल्याचे मुख्याध्यापिका वैशाली मुणगेकर यांनी सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post