ठाण्यात स्वच्छता मोहिमेला सुरुवात

ठाणे: ठाणे महानगरपलिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानाचा शुभारंभ शनिवारी वागळे इस्टेट रोड नंबर २२ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM EKNATH SHINDE) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला .

शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. येत्या २४ फेब्रुवारीपर्यंत हे अभियान शहरात सुरू राहणार असून संपूर्ण ठाणे शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचे उद्दिष्ट या अभियानाच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.  

मोहिमेच्या पहिल्या शनिवारी मुख्यमंत्री, आयुक्त, माजी आमदार, माजी नगरसेवक यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेची सुरुवात केली. ही मोहीम प्रत्येक शनिवारी राबवली जाणार आहे.

यावेळी ठाणे महानगरालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर, ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी नगसेवक प्रकाश शिंदे, विभागप्रमुख एकनाथ भोईर, बबन मोरे तसेच शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, महापालिका अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक आणि आध्यात्मिक संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post