मनसे शाखा, रेड क्लिप लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबीर

दिवा, (आरती मुळीक परब) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना साबेगाव शाखेच्या वतीने शहर अध्यक्ष तुषार भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात रक्ताच्या सि.बि.सी, कॅल्शिअम, कॉलेस्ट्रॉल, शुगर, रॅंडम अशा विविध टेस्ट अवघ्या २० रुपयांत करण्यात आल्या. या आरोग्य शिबिराला विभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

यावेळी शहर अध्यक्ष तुषार भास्कर पाटील, विभाग अध्यक्ष देवेंद्र भगत, प्रकाश पाटील, प्रभाग सचिव परेश पाटील, शैलेंद्र कदम, साबेगड शाखा अध्यक्ष सयाजी चव्हाण (सरकार), नम्रता खराडे, सागर निकम, उपशाखा अध्यक्ष सागर गावकर,मिथिल दुदवडकर, गट अध्यक्ष प्रविण धुरी, वैभव पडवळ, सिध्देश पडवळ, इतर पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post